
मार्च महिन्यात वीज न तोडता वसुलीला गती देण्यासाठी मुख्य अभियंता पावडे यांनी सर्व वीज कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी ‘एक गाव, एक दिवस’ उपक्रम घेण्याचे निर्देश दिले आहेत.
बारामती (पुणे) : पुढील आदेश येईपर्यंत वीज जोडणी-तोडणी थांबवण्याचे निर्देश महावितरण प्रशासनाने दिल्यानंतर महावितरणच्या क्षेत्रीय कार्यालयांनी आता तोडून नाही, तर हात जोडून वसुली करण्याचा अभिनव उपक्रम अवलंबला आहे.
बारामती परिमंडलात ज्या 612 गावांमध्ये ‘एक गाव, एक दिवस’ हा उपक्रम राबवला आहे, त्या गावात शेतीपंपाच्या वसुलीला शेतकरी स्वत:हून प्रतिसाद देत आहेत. त्या जोरावरच महावितरणने 91 कोटींचा टप्पा गाठला आहे. गावातून वसूल झालेल्या 33 टक्के रकमेतूनही वीजेची कामे तातडीने करण्यास आणि प्रलंबित कृषी जोडण्या देण्यास महावितरणने सुरुवात केली आहे. दोन महिन्यात सात हजार 896 कृषी जोडण्या देण्यात आल्या आहेत.
- रुबाब खाकीचा, विषय नाही बाकीचा! PSI पल्लवी जाधव ठरल्या 'मिस इंडिया' फर्स्ट रनर अप!
गेल्या दोन वर्षांपासून मुख्य अभियंता सुनील पावडे यांच्या संकल्पनेतून बारामती परिमंडलात ‘एक गाव, एक दिवस’ उपक्रम राबविण्यास सुरुवात झाली. नियोजनपूर्वक गावात जाऊन तेथील ग्रामस्थांच्या वीजेच्या समस्या, वीजबिलाच्या तक्रारी निवारण्याचे काम या उपक्रमाने केले आहे. या गावांमध्ये ‘महा कृषी ऊर्जा अभियानां’तर्गत वीजबिल वसुलीला भरघोस प्रतिसाद मिळत आहे.
बारामती परिमंडलात आतापर्यंत 56 हजार 389 शेतकऱ्यांनी थकबाकी आणि चालूबिलापोटी 91 कोटी 38 लाखांचा भरणा केला त्यांना सवलतीपोटी तब्बल 68 कोटी 54 लाखांची माफी मिळालेली आहे.
- खेड-शिवापूर टोलनाक्याच्या बनावट पावत्या प्रकरणाबाबत मोठी बातमी
मार्च महिन्यात वीज न तोडता वसुलीला गती देण्यासाठी मुख्य अभियंता पावडे यांनी सर्व वीज कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी ‘एक गाव, एक दिवस’ उपक्रम घेण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच ज्या गावातील शेतकऱ्यांनी वीजबिलाचा भरणा केला आहे, तिथे ग्रामपंचायतीच्या सूचनेनुसार रोहित्र दुरुस्ती, क्षमता वाढवणे, नवीन कनेक्शन देणे यांसह यंत्रणेच्या दुरुस्तीची कामे तातडीने करण्यास सांगितले आहे.
- रास्ता पेठेत इमारतीला भीषण आग; 3 फ्लॅट्स व 2 दुकानं भस्मसात
भोर तालुक्यातील भांबवडे गावच्या गरुड रोहित्रावरील सर्व शेतकऱ्यांनी बुधवारी एकत्र येत त्यांच्या 12 लाख रुपये थकबाकीपोटी साडेपाच लाखांचा एकरकमी भरणा केला. त्यांचे साडे सहा लाख रुपये माफ झाले. त्यांच्या रोहित्राची संपूर्ण दुरुस्तीचे काम गुरुवारी करण्यात येणार आहे. अतिरिक्त भारापोटी नवीन रोहित्राचेही नियोजन केले जाणार आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)