esakal | चोवीस तासांच्या आत 80 गावांचा वीज पुरवठा सुरळीत

बोलून बातमी शोधा

msedcl
चोवीस तासांच्या आत 80 गावांचा वीज पुरवठा सुरळीत
sakal_logo
By
मनोज कुंभार-वेल्हे

वेल्हे (पुणे) : राजगड, तोरणा परिसरात गेल्या आठवड्यात कमी अधिक पाऊस पडत होता तर रविवार (ता. २) रोजी जोराच्या वादळी वारा व पावसामुळे (heavy rain) या परिसरातील सात विजेचे विद्युत पोल जमिनदोस्त झाले होते. यामुळे या परिसरातील ऐंशी पेक्षा अधिक गाव वाड्या वस्त्यांचा विद्युत पुरवठा खंडीत झाला होता, परंतु महाविरणच्या अधिकारी कर्मचा-यांच्या तत्पर सेवा व परिश्रमामुळे अवघ्या चोवीस तासाच्या आत विद्युत पुरवठा (power supply) सुरळीत झाल्याने तालुक्यातील नागरीकांनकडुन महावितरण (msedcl) कर्मचा-यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. (msedcl restored power supply to 80 villages within 24 hours).

रविवारी पडलेल्या वादळी वा-यामुळे या परिसरातील पाबे मंडलातील चार पोल व विंझर मंडलातील तीन विद्युत पोल उन्मळुन पडल्याची माहिती मिळताच महावितरणचे उपकार्यकारी अभियंता शैलेश गिते, शाखा अभियंता विठ्ठल भरेकर, संतोष शिंदे यांनी या परिसराची पाहणी केली, यामुळे ऐंशी पेक्षा अधिक गाव वाड्या वस्त्यावरील विद्युत पुरवठा खंडीत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेता महाविरणच्या पंचेचाळीस कर्मचा-यांच्या मदतीने चिखलातुन ,वि्दयुत पोल खांद्या डोक्यावर नेऊन, झाडावर चढुन लाईन ओढत अवघ्या चोवीस तासांच्या आत विद्युत पुरवठा सुरळीत केला गेला. यामुळे गाव वाड्यासंह कोंढावळे येथे सुरु असलेल्या कोवीड केअर सेंटरच्या रुग्णांना दिलासा मिळाला. या तत्पर सेवेमुळे राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस आनंद देशमाने यांच्यासह तालुक्यातील नागरीकांनी तसेच नेटक-यांनी सोशल मिडियाच्या माघ्यमातुन उपकार्यकारी अभियंता शैलेश गिते यांच्यासह पुर्ण टिमवर अभिनंदनाचा वर्षाव केला.

हेही वाचा: पुणे मार्केटयार्डातील फळविभागामधील बारा बेशिस्त अडत्यांवर दंडात्मक कारवाई

परिसराची पाहणी केल्यानंतर कामथडी वरुन येणारी ३३ केव्हीच्या लाईनचे तीन पोल तर ११ केव्हीचे चार पोल पडल्याने ऐंशीपेक्षा अधिक गाव वाड्यांवरील विद्युत पुरवठा बंद असल्याने युध्दपातळीवर काम करुन कर्मचा-यांच्या कार्यतत्परसेवेमुळे विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यश आले.

-शैलेश गिते ,उपकार्यकारी अभियंता महावितरण.

हेही वाचा: पिंपरी-चिंचवडमध्ये संसर्ग वाढला; मृत्यूदर घटला