लवासा मध्ये covid सेंटर सुरू करण्याची मुळशीकरांची मागणी

धोंडिबा कुंभार
Monday, 27 July 2020

'मुळशी तालुक्यात कोरोनाने पाचशेचा आकडा पार केला असून तालुक्यातील लोकांसाठीच बेड उपलब्ध नाहीत. वेळेवर उपचार उपलब्ध होत नाहीत म्हणून मुळशीकरांना वारंवार विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे लवासा येथे अगोदरच तयार स्थितीमध्ये असलेले आणि सध्या रिकामेच असलेले अपोलो हॉस्पिटल, परिसरातील विविध हॉटेल्स तसेच अन्य बंगलो व इमारती शासनाने ताब्यात घेऊन तेथे मुळशीकरांसाठी स्वतंत्र कोव्हिड सेंटर उपलब्ध करून देण्यात यावे. 

पिरंगुट : मुळशी तालुक्यातील लवासा येथे कोव्हिड केअर सेंटर तातडीने उभारण्याची मागणी भाजपा युवा मोर्चाचे तालुका कार्याध्यक्ष सागर मारणे यांनी केली आहे. त्यासंबंधीचे निवेदन मारणे यांनी खासदार गिरीश बापट यांना दिले असून बापट यांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत तातडीने कार्यवाही करण्यासंबंधीचे पत्र दिले आहे. त्यानुसार, लवासात लवकरच हे सेंटर सुरू होणार असल्याचे सागर मागणे यांनी सांगितले.

कॅनॉलमध्ये वाहत चाललेल्या 'त्या' मायलेकींच्या मदतीला धावला देवदूत!​

''मुळशी तालुक्यात कोरोनाने पाचशेचा आकडा पार केला असून तालुक्यातील लोकांसाठीच बेड उपलब्ध नाहीत. वेळेवर उपचार उपलब्ध होत नाहीत म्हणून मुळशीकरांना वारंवार विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे लवासा येथे अगोदरच तयार स्थितीमध्ये असलेले आणि सध्या रिकामेच असलेले अपोलो हॉस्पिटल, परिसरातील विविध हॉटेल्स तसेच अन्य बंगलो व इमारती शासनाने ताब्यात घेऊन तेथे मुळशीकरांसाठी स्वतंत्र कोव्हिड सेंटर उपलब्ध करून देण्यात यावे. मुळशी तालुका भाजपा युवा मोर्चा व बापट यांच्यासोबत झालेल्या चर्चेनुसार, मुळशीकरांना तालुक्यात लवासा येथे स्वतंत्रकोव्हिडसेंटर उपलब्ध करून देण्यात यावे. त्यानुसार, खासदार बापट यांनीही जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन लवासातकोव्हिडसेंटर उभारण्याची मागणी केली आहे'' असे निवेदनात म्हटले आहे.

अजित पवारांवरील प्रेमापोटी बारामतीचा 'आयर्नमॅन' धावला नॉनस्टॉप १०० कि.मी.!​

''मुळशी तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून रुग्णांवर उपचार करण्यासाठी बेड उपलब्ध होत नाहीत. परिणामी रुग्णांना नाहक त्रास होतो. कोरोना प्रादुर्भावाच्या काळात पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक तसेच इतर मोठ्या शहरांमध्ये प्रशासनाने खासगी हॉटेल्स, हॉस्पिटल्स, शाळा, महाविद्यालये तसेच खासगी प्रॅापर्टी ताब्यात घेतलेल्या आहेत. त्याच धर्तीवर  मुळशीतील लवासा येथे शेकडो बेड उपलब्ध होऊ शकतात'', असे खासदार बापट यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे

अकरावी अॅडमिशन : पहिल्या दिवशी 'इतक्या' विद्यार्थ्यांनी केले ऑनलाईन रजिस्ट्रेशन!

याबाबत सागर मारणे म्हणाले, "तालुक्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या पाचशेहून अधिक झाली आहे. अनेक रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे तालुक्यातील ही कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता लवासातील रिकाम्या इमारती शासनाने तातडीने ताब्यात घेणे अत्यावश्यक आहे. त्याबाबतचे निवेदन आम्ही खासदार गिरीश बापट यांना दिले असून बापट यांनी जिल्हाधिकाऱ्यांना त्या संबंधीचे पत्र दिलेले आहे. लवासातील हे कोव्हिड केअर सेंटर सुरू झाले तर मुळशीकरांची मोठी सोय होणार आहे. "  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप ​
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mulshi Citizens are demanding start of covid center in Lavasa