मुंबई लेन पूर्ण बंद, पुणे मार्गावर १२ किमी वाहनांच्या रांगा; उलटलेल्या टँकरमधून गॅस गळती वाढली

Mumbai Pune Expressway Traffic : मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर टँकर उलटल्यानं प्रचंड वाहतूक कोंडी झालीय. गॅस गळती वाढल्यानं पोलिसांनी मुंबई लेन बंद केलीय तर पुणे मार्गावर प्रचंड वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
Mumbai Pune Expressway Traffic

Mumbai Pune Expressway Traffic

Esakal

Updated on

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर खोपोली हद्दीत बोरघाटातील आडोशी बोगद्याजवळ मंगळवारी सायंकाळी गॅस टँकर उलटला. यामुळे गेल्या १८ तासांपासून मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झालीय. वाहतूक पोलिसांनी लोणावळा खंडाळा मार्ग टाळण्याचं आवाहन वाहनचालकांना केलंय. आडोशी बोगद्याजवळ प्रोपिलीन या ज्वलनशील वायूने भरलेला टँकर अचानक उलटला. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई लेन बंद केलीय. तर पुणे लेनवर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com