

Mumbai LLB Student Dies After Fall From Tiger Point In Lonavala
Esakal
लोणावळ्यातील टायगर पॉइंटच्या दरीत एका २० वर्षीय तरुणीचा मृतदेह रविवारी आढळून आला. श्रेया नरेंद्र पती (रा. सीबीडी बेलापूर, नवी मुंबई) असे या मृत तरुणीचे नाव असून, ती बेपत्ता असल्याची नोंद लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यामध्ये करण्यात आली होती. लोणावळा ग्रामीण पोलिस व शिवदुर्ग रेस्क्यू टीमने अथक परिश्रमाने रात्री उशिरा सदर तरुणीचा मृतदेह दरीतून बाहेर काढला.