

Mumbai Pune Expressway Traffic
ESakal
मुंबई : मुंबई-पुणे महामार्गावर मंगळवार (ता. ३ फेब्रुवारी) रोजी पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या एका टॅंकरचा मोठा अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने आडोशी बोगद्याजवळ हा टँकर पलटी झाला असून यामुळे मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. या अपघातानंतर तब्बल ८ तास वाहतूक कोंडी झाली होती. यानंतर आता एक लेन खुली कऱण्यात आली असली तरीही वाहतूक कोंडी कायम असल्याचे चित्र आहे. त्यामुळे मुंबई-पुणे महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे.