Mumbai Pune Expressway Traffic
esakal
लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर (Mumbai Pune Expressway Traffic) बोरघाटात गॅस गळती झालेला टँकर गुरुवारी मध्यरात्री एकच्या सुमारास हटवण्यात आला. त्यानंतर दीडच्या सुमारास मुंबईकडे जाणारी मार्गिका सुरू करण्यात आली. दरम्यान, मंगळवारी (ता.३) सायंकाळी साडेपाचपासून विस्कळित झालेली वाहतूक तब्बल ४४ तासांनंतर म्हणजेच गुरुवारी दुपारनंतर पूर्वपदावर आली. (Gas Tanker Leak Disrupts Mumbai Pune Expressway Traffic for 44 Hours)