Sheetal Tejwani Arrest : शीतल तेजवानीची रवानगी येरवडा कारागृहात; ३०० कोटींच्या व्यवहाराबाबत मौन!

Mundhwa Land Scam : मुंढवा येथील सरकारी जमिनीच्या बेकायदा व्यवहार प्रकरणात अटक शीतल तेजवानीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. ३०० कोटींच्या व्यवहाराबाबत माहिती न दिल्याने तिला येरवडा कारागृहात ठेवण्याचे आदेश देण्यात आले.
Sheetal Tejwani Sent to Yerwada Jail in Mundhwa Land Case

Sheetal Tejwani Sent to Yerwada Jail in Mundhwa Land Case

Sakal

Updated on

पुणे : मुंढव्‍यातील चाळीस एकर सरकारी जमिनीच्या बेकायदा खरेदी-विक्री प्रकरणात अटक शीतल तेजवानीची रवानगी सोमवारी येरवडा कारागृहात करण्‍यात आली आहे. तीनशे कोटी रुपयांच्‍या व्यवहारात तिच्याकडे पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतरही माहिती देत नसल्याचे पुणे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. यानंतर न्यायालयाने तेजवानीला न्यायालयीन कोठडी सुनावत तिची रवानगी येरवडा कारागृहात केली. पोलिस कोठडीची मुदत संपल्याने तिला सोमवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com