esakal | बायकोचे अनैतिक संबंध कोणाला सांगू नयेत म्हणून बहाद्दराने केला सख्या भावाचा खून 
sakal

बोलून बातमी शोधा

बायकोचे अनैतिक संबंध कोणाला सांगू नयेत म्हणून बहाद्दराने केला सख्या भावाचा खून 

तिघांनीही संतोषचा खून करून त्याचा मृतदेह फार्महाऊसच्या कोपऱ्यात पुरल्याची कबूली दिली. त्यानंतर कुलकर्णी यांनी पौड पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दिली.

बायकोचे अनैतिक संबंध कोणाला सांगू नयेत म्हणून बहाद्दराने केला सख्या भावाचा खून 

sakal_logo
By
बंडू दातीर

पौ़ड : बायकोचे दुसऱ्याशी असलेले अनैतिक संबंध गावाला नातेवाईकांना सांगू नये म्हणून सख्ख्या भावानेच भावाचा दहा दिवसांपूर्वी खून करून मृतदेह खड्ड्यात पुरला. कुळे (ता.मुळशी) येथे रविवारी (22 नोव्हेंबर) ही घटना उघडकीस आली.

 'मला चंपा म्हणता, ते चालतं का? चंद्रकांत पाटलांचा राष्ट्रवादीला सवाल​

विशेष म्हणजे बायकोशी अनैतिक संबंध असलेल्या युवकालाच बरोबर घेवून भावाने, पत्नीच्या सहाय्याने हा खून केला. संतोष विश्वनाथ बाळेकाई (वय 40, रा.अक्कलकोट, जि. सोलापूर) असे खून झालेल्या युवकाचे नाव असून त्याचा संगनमताने खून करणाऱ्या स्वामीनाथ उर्फ उमेश विश्वनाथ बाळेकाई (वय 45), अमृता उमेश बाळेकाई (वय 38), विजयकुमार नारायण राठोड (वय 44 ) (तिघेही रा. कुळे) यांना पौड पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः पुण्यातील प्रसाद कुलकर्णी यांचे कुळे येथे फार्महाऊस आहे. या फार्महाऊसमध्ये स्वामीनाथ, अमृता आणि विजयकुमार हे तिघेजण केअरटेकर म्हणून काम करीत होते. अमृता आणि विजयकुमार यांचे गेली अनेक दिवसांपासून अनैतिक संबंध होते. अमृताचा पती स्वामीनाथ यालाही त्याची खबर होती. स्वामीनाथचा भाऊ संतोष हे दिवाळीच्या दरम्यान अक्कलकोटहून कुळ्याला भावाकडे आले होते. त्यावेळी त्यांना अमृता आणि विजय यांच्यामधील अनैतिक संबंधाची माहीती मिळाली. संतोषने अमृताला भावाचा संसार उघड्यावर आणू नको, अशी विनंतीही केली होती.

तथापि संतोष गावी गेल्यानंतर बायकोच्या अनैतिक संबंधाची माहिती नातेवाईक, ग्रामस्थांना देईल, अशी भिती स्वामीनाथला होती. त्यामुळे स्वामीनाथ, अमृता आणि विजयकुमार या तिघांनी संगनमताने शुक्रवारी (13 नोव्हेंबर) धनत्रयोदशीच्या दिवशी रात्री संतोषला ठार मारले. फार्महाऊसच्याच एका बाजूला खड्डा खणून त्यात संतोषचा मृतदेह पुरला. याबाबत कुणालाही काहीही कळू दिले नाही.

दोन दिवसांपूर्वी प्रसाद कुलकर्णी पुण्याहून फार्महाऊसकडे आले त्यावेळी त्यांनी संतोषची चौकशी केली. त्यावेळी स्वामीनाथ, अमृता, मुले यांच्याकडून वेगवेगळी उत्तरे मिळाली. त्याचवेळी कुलकर्णी यांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. रविवारी (22 नोव्हेंबर) कुलकर्णी फार्महाऊसला आले. त्यांनी शेताभोवती चक्कर मारली. त्यावेळी शेताच्या एका कोपऱ्यात त्यांना घाण वास आला. त्यानंतर त्यांनी तिघांनाही विश्वासात घेवून खरं काय आहे याची माहिती घेतली.

अनावश्यक वादात चंद्रकांत पाटील यांना ओढणं चुकीचं!​

त्यावेळी तिघांनीही संतोषचा खून करून त्याचा मृतदेह फार्महाऊसच्या कोपऱ्यात पुरल्याची कबूली दिली. त्यानंतर कुलकर्णी यांनी पौड पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली असून न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रेखा दूधभाते करीत आहेत.

(संपादन : सागर डी. शेलार)

loading image