दौंडमध्ये किरकोळ वादातून चुलत भावाचा खून

crime.
crime.
Updated on

वरवंड (पुणे) : दौंड तालुक्यातील पडवी येथे किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून चुलत भावाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

पोपट वसंत गायकवाड (वय 35, रा. पडवी- गायकवाडमळा, ता. दौंड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी रमेश उर्फे खंडू विष्णू गायकवाड (वय 42) याच्या विरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सुर्यकांत गायकवाड याने यवत पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक रामभाऊ घाडगे यांनी माहिती दिली की, पोपट व रमेश हे पडवी येथील गायकवाडमळा भागातील रहिवाशी आहेत. सोमवारी (ता. 1) सायंकाळी सात वाजता पोपट व रमेश यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. या वेळी आरोपी रमेश गायकवाड याने पोपट गायकवाड याच्याच घराबाहेर त्याला चाकूने भोसकले. या वेळी इतर नागरिकांनी जखमी पोपट यास दवाखान्यात हलविले. मात्र, गंभीर जखमी झाल्याने पोपट याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.

याबाबतची माहिती मिळताच दौंड उपविभागीय पोलिस अधिकारी एश्वर्या शर्मा, पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, पोलिस उपनिरीक्षक रामाभाऊ घाडगे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरोपीस काही वेळातच अटक केली. त्याला मंगळवारी (ता. 2) दौंड न्यायालयात हजर केले असता पाच दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणी पुढील तपास फौजदार रामभाऊ घाडगे करीत आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com