दौंडमध्ये छायाचित्रकाराचा खून; मृतदेहाजवळ आढळल्या दारूच्या रिकाम्या बाटल्या

प्रफुल्ल भंडारी 
Sunday, 4 October 2020

मृतदेहाजवळ दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या आहेत. प्रभारी पोलिस उप अधीक्षक नारायण शिरगावकर (बारामती), पोलिस निरीक्षक सुनील महाडिक, आदींनी घटनास्थळाची पाहणी केली.

दौंड (पुणे) : दौंड शहरातील छायाचित्रकार केदार श्रीपाद भागवत (वय ४६) यांचा लिंगाळी हद्दीत खून करण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; अंतिम वर्ष परीक्षेचं वेळापत्रक झालं जाहीर!

दौंड-लिंगाळी रस्त्यालगत काळे मळा येथील कालव्यालगत आज सकाळी साडेनऊ वाजता केदार भागवत (वय ४६, रा. शालीमार चौक, दौंड) यांचा मृतदेह आढळून आला. डोक्यात दगड घालून व बाटली फोडून खून करण्यात आला आहे.

मृतदेहाजवळ दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या आहेत. प्रभारी पोलिस उप अधीक्षक नारायण शिरगावकर (बारामती), पोलिस निरीक्षक सुनील महाडिक, आदींनी घटनास्थळाची पाहणी केली. या बाबत दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. खुनाचे कारण स्पष्ट झालेले नाही. 

तर एक नोव्हेंबरपासून मराठा समाज रस्त्यावर उतरेल; विनायक मेटे यांचा इशारा

शहरातील ज्येष्ठ व जाणते छायाचित्रकार श्रीपाद भागवत यांचे केदार हे ज्येष्ठ चिरंजीव आहेत. दौंडचे पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांनी या बाबत सांगितले की, डोक्यात दगड घालून खून केल्याचे आढळून आले आहे. सर्व शक्यता विचारात घेऊन खुनाचा तपास केला जात आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: murder of a photographer in daund taluka