पत्नीप्रमाणे सोबत राहत असलेल्या मैत्रिणीचा संशयावरून त्याने गळाच... 

crime
crime

शिरूर (पुणे) : चारित्र्याच्या संशयावरून मैत्रिणीचा धारदार चाकूने गळा चिरून हत्या करणारा हल्लेखोर खून करून आज सकाळी स्वतःहून पोलिसांसमोर हजर झाला.  शिरूर येथील वाडा कॉलनी परिसरात भाड्याने खोली घेऊन गेल्या सात महिन्यांपासून हे जोडपे पती- पत्नी म्हणून राहात होते.

सारिका सुदाम गिरमकर (वय 30, रा. वाडा कॉलनी, शिरूर) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून, ती निमोणे (ता. शिरूर) येथील कुऱ्हाडवाडी येथील रहिवासी होती. या खून प्रकरणी पोलिसांनी दत्तात्रेय गेणुभाऊ गायकवाड याला अटक केली. तो मूळचा शिंदोडी (ता. शिरूर) येथील़ रहिवासी असून, मृत सारिका गिरमकर हिच्यासमवेत गेल्या सात महिन्यांपासून येथील वाडा कॉलनी परिसरात बबन पर्वतराव शेटे यांच्या मालकीची खोली भाड्याने घेऊन राहात होता.  बबन शेटे यांनीच याबाबतची फिर्याद शिरुर पोलिसांकडे दिली.

याबाबत पोलिसांनी माहिती दिली की, कारेगाव येथील खासगी कंपनीच्या वाहनावर चालक म्हणून काम करणारा दत्तात्रेय गायकवाड हा जानेवारी महिन्यात शेटे यांच्या वाडा कॉलनी येथील खोलीत राहण्यास आला. त्याच्यासोबत असलेल्या महिलेचे नाव सारिका दत्तात्रेय गायकवाड असल्याचे व ती पत्नी असल्याचे त्याने त्यावेळी घरमालकाला सांगितले होते. सारिका ही येथील एका रूग्णालयात कामाला होती. सुरवातीला समंजसपणे वागणाऱ्या या जोड़प्यात गेल्या दहा- पंधरा दिवसांपासून सातत्याने वादावादी होऊ लागली. त्यामुळे शेटे यांनी त्यांना, 'मला भांडणतंटा आवडत नाही, भांडणे करायची असतील तर खोली करावी लागेल,' असे बजावले होते.

दरम्यान, आज सकाळी दत्तात्रेय गायकवाड हा पत्नीचा खून करून पोलिस स्टेशनला हजर झाला असल्याचे समजले. त्यामुळे शेटे यांनी तो राहात असलेल्या खोलीत जाऊन पाहिले असता, तेथे सारिका हीचा गळा चिरलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. त्यामुळे शेटे यांनी पोलिस स्टेशनला धाव घेतली. त्यावेळी त्यांनी हल्लेखोर गायकवाड याच्याकडे या प्रकाराबाबत विचारणा केली असता, ती माझी पत्नी नसून, आमची ओळख व प्रेम होते, असे त्याने सांगितले. तसेच, तीचे इतर एका मुलाशी प्रेम असल्याने तीला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. परंतुस तीने न ऐकल्याने पहाटे पावणेदोनच्या सुमारास ती झोपेत असताना चाकूने गळा कापून खून केल्याची माहिती त्यांना दिली. या माहितीच्या आधारे शेटे यांनी गायकवाड याच्याविरूद्ध फिर्याद दिली. 
    
दरम्यान, आज सकाळी निर्घृण खूनाचा हा प्रकार उघडकीस आल्यानंतर वाडा कॉलनी परिसरात खळबळ उडाली. पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे, सहायक पोलिस निरीक्षक बी. एन. काबुगडे यांनी काही पोलिसांसह घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. हल्लेखोर गायकवाड याला पोलिसांनी अटक केली असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक काबुगडे करीत आहेत.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com