Vidhan Sabha 2019 : तात्पुरत्या मलमपट्टीपेक्षा कायमस्वरूपी उपाययोजनांवर माझा भर : शिरोळे

सकाळ वृत्तसेवा
Monday, 14 October 2019

एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या मतदारसंघातील समस्यांवर तात्पुरती मलमपट्टी करण्यापेक्षा दीर्घकालीन नियोजनाद्वारे कायमस्वरूपी उपाययोजना आखण्यावर माझा भर असेल, अशा शब्दांत भारतीय जनता पक्ष-शिवसेना महायुतीचे शिवाजीनगर मतदारसंघातीलअधिकृत उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांनी सोमवारी त्यांची भूमिका मांडली.

पुणे : एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या मतदारसंघातील समस्यांवर तात्पुरती मलमपट्टी करण्यापेक्षा दीर्घकालीन नियोजनाद्वारे कायमस्वरूपी उपाययोजना आखण्यावर माझा भर असेल, अशा शब्दांत भारतीय जनता पक्ष-शिवसेना महायुतीचे शिवाजीनगर मतदारसंघातीलअधिकृत उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांनी सोमवारी त्यांची भूमिका मांडली.

“पुणे हे मेट्रो सिटीच्या दिशेने झपाट्याने वाटचाल करत असताना नागरिकरणाच्या समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहेत. अशा वेळी एक लोकप्रतिनिधी म्हणून केवळ प्रभागातील किंवा मतदारसंघातील नागरिक कोणती समस्या घेऊन आल्यावर त्यावर तात्पुरती मलमपट्टी करणं योग्य ठरणार नाही. तर त्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्या लागतील.

सिद्धार्थ शिरोळेंच्या प्रचारार्थ निलम गोऱ्हे संजय काकडे मैदानात

डेक्कन जिमखाना-मॉडेल कॉलनी या प्रभाग क्रमांक १४ मध्ये गेली दोन वर्ष नगरसेवक म्हणून जबाबदारी सांभाळताना अशा काही उपाययोजना करण्यात मी यशस्वी ठरलो याचे मला समाधान आहे. आमदार म्हणून निवडून आल्यास माझ्या कार्यक्षेत्रात वाढ होणार असली, तरी समस्येच्या मुळाशी जात ठोस उपाय करण्यावर माझा नेहमी भर असेल,”असे सिद्धार्थ शिवाजीनगर परिसरातील मतदारांशी संवाद साधताना म्हणाले.

मतदारांच्या गाठीभेटी घेत शिरोळेंचा प्रचार सुरु

घोले रस्ता आणि दीप बंगला चौकात वाहतूक कोडींच्या प्रश्नाने गंभीर रूप धारण केले होते. यामुळे या परिसरातील अपघातांमध्येही वाढ झाली होती. या दोन्ही परिसरातील वाहतुकीचा अभ्यास करत, महापालिका अधिकारी आणि वाहतूकपोलिसांशी समन्वय साधत तसेच परिसरातील नागरिकांशी चर्चा करत घोलेरस्ता आणि दीप बंगला चौकात वर्तुळाकार वाहतूकव्यवस्था राबवण्यात आणिती यशस्वी करून दाखवण्यात सिद्धार्थ शिरोळे यांना यश आले.

सिद्धार्थ शिरोळेंच्या पदयात्रेस नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

शिवाजीनगर मतदारसंघातील सर्वच नागरिकांच्या माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत. आमदार म्हणून निवडून आल्यास त्यांच्या पूर्ततेसाठी मी निश्चित प्रयत्न करीन, अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: My emphasis is on permanent solutions says Sidharth Shirole