

Scientific Breakthrough: New Frog Species Identified in Northeast India
sakal
पुणे: नागालँडच्या दुर्गम डोंगररांगांतील धबधब्यांच्या सान्निध्यात बेडकाची एक नवी प्रजाती सापडली असून, या महत्त्वपूर्ण शोधामुळे ईशान्य भारताच्या जैवविविधतेतील आणखी एक गूढ उलगडले आहे. ‘अमोलॉप्स कमला’ असे या नव्या प्रजातीचे नामकरण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या संशोधनात पुण्यातील भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्थेच्या पश्चिम विभागीय केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. के. पी. दिनेश यांचा महत्त्वपूर्ण सहभाग आहे.