पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सभागृहनेतेपदी नामदेव ढाके यांची निवड

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 12 February 2020

पिंपरी चिंचवड महापालिका प्रभाग क्रमांक 17 वाल्हेकरवाडी, चिंचवडेनगर, बिजलीनगरमधून ढाके पहिल्यांदाच निवडून आले आहेत. भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. भाजपची महापालिकेत सत्ता आल्यानंतर ढाके पहिल्या अडीच वर्षात महापौरपदासाठी प्रबळ दावेदार होते. परंतु, सत्तासंघर्षामध्ये त्यांची संधी हुकली. आता सभागृहनेतेपदी वर्णी लागल्याने निष्ठावंताला अखेर न्याय मिळाला आहे. 

पिंपरी : महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या सभागृहनेतेपदी नामदेव ढाके यांची निवड करण्यात आली. या बाबत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या शिफारशीचे पत्र पुण्याच्या विभागीय आयुक्तांना देण्यात आले आहे. अशी माहिती भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप यांनी बुधवारी दिली. मावळते सभागृह नेते एकनाथ पवार यांनी पेढा भरवून ढाके यांचे अभिनंदन केले. पवार यांनी सोमवारी पदाचा राजीनामा दिला होता. 

कोरोनामुळे चीनच्या गाेंजाऊचे आर्थिक व्यवहार थंडावले; भारतीय उद्योजक चिंतेत

फेब्रुवारी 2017 मध्ये महापालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून जुने आणि भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते एकनाथ पवार यांच्याकडे सभागृह नेतेपदाची जबाबदारी होती. तीन वर्ष त्यांनी सक्षमपणे कामकाज केले. आता त्यांच्या जागी ढाके यांची वर्णी लागली आहे. भाजपच्या बैठकीत ढाके यांच्या नावावर एकमत करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या शिफारशीचे पत्र पुण्याचे विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्हैसेकर यांना देण्यात आले आहे. 

तरुणीला एमबीबीएसला अॅडमिशन देतो म्हणाला अन् 

खानदेश पुत्राला न्याय....

पिंपरी चिंचवड महापालिका प्रभाग क्रमांक 17 वाल्हेकरवाडी, चिंचवडेनगर, बिजलीनगरमधून ढाके पहिल्यांदाच निवडून आले आहेत. भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. भाजपची महापालिकेत सत्ता आल्यानंतर ढाके पहिल्या अडीच वर्षात महापौरपदासाठी प्रबळ दावेदार होते. परंतु, सत्तासंघर्षामध्ये त्यांची संधी हुकली. आता सभागृहनेतेपदी वर्णी लागल्याने निष्ठावंताला अखेर न्याय मिळाला आहे. त्यांनी यापूर्वी भाजपच्या कामगार आघाडीचे शहराध्यक्षपद देखील भूषविले आहे. ढाके हे मूळचे जळगाव जिल्ह्यातील वराड सीम ता. भुसावळ येथील रहिवाशी आहे. त्यांना महापौर पद मिळावे, यासाठी शहरातील खान्देशी बांधवांनी पक्ष नेतृत्वाकडे मागणी केली होती

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Namdev Dhake appointed as Leader of the House in Pimpri Chinchwad Municipal