ज्यांनी निधी उपलब्ध करून दिला त्यांचीच नावे निमंत्रण पत्रिकेतून वगळली; कोण आहेत ते पहा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 14 August 2020

शहर आणि परिसरात गेल्या पाच महिन्यापासून कोरोना महामारीने धुमाकूळ घातला आहे. ही बाब लक्षात घेऊन पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल रूग्णालयात अतिदक्षता विभाग (आयसीयु) सुरू करण्याबाबत हालचाली झाल्या. अखेर अनेक संस्थांच्या पाठपुरवठ्यामुळे  बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल रूग्णालयात सुसज्ज असलेला अतिद्क्षता विभाग  15 ऑगस्टपासून सुरू होणार आहे.

कॅन्टोन्मेंट - शहर आणि परिसरात गेल्या पाच महिन्यापासून कोरोना महामारीने धुमाकूळ घातला आहे. ही बाब लक्षात घेऊन पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल रूग्णालयात अतिदक्षता विभाग (आयसीयु) सुरू करण्याबाबत हालचाली झाल्या. अखेर अनेक संस्थांच्या पाठपुरवठ्यामुळे  बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल रूग्णालयात सुसज्ज असलेला अतिद्क्षता विभाग  15 ऑगस्टपासून सुरू होणार आहे.  हे विभाग सुरु करण्यासाठी 15 ऑगस्ट रोजी  बोर्डाने उदघाटन समारंभाचा कार्यक्रम नियोजित केला आहे. मात्र यावेळी निमंत्रण पत्रिकेतून चक्क पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांची नावे  वगळली गेली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हे विभाग सुरु करण्यासाठी  राज्य शासनाच्या अखत्यारित असलेल्या जिल्हा प्रशासनाने सुमारे सव्वा दोन कोटी, आमदार, खासदार निधी बरोबरच पुन्हा पालकमंत्री यांनी देखील खास बाब म्हणून तीन कोटी रूपयांचा निधी मंजुर केला होता. एकूण सुमारे सहा कोटीहून अधिकचा निधी या आयसीयु साठी मिळाला आहे.

मुळशीत पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला

तसेच जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री अजित पवार यांनी जास्तीजास्त निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र निमंत्रण पत्रिकेत पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांची नावेच वगळण्यात आली आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या विरोधात काही राजकीय नेते तसेच पदाधिकारी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. केवळ भाजपाच्या नेत्यांचीच नावे  टाकली असल्याची टीका देखील करण्यात येत आहे.

खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

पटेल रूग्णालयात एप्रिल महिन्यापासून आयसीयु उभारण्याची प्रक्रीया सुरू करण्यात आली.  एक महिन्यानंतर प्रत्यक्षात रूग्णासाठी आवश्यक असलेला सुसज्ज आयसीयु उभा राहिला. मात्र त्यानंतर बोर्ड प्रशासन आणि नगरसेवकांच्या हेवेदाव्यामुळे गेल्या दोन महिन्यापासून आयसीयु सुरू होण्यास मुहूर्त मिळत नव्हता. याची दखल घेत शहरातील सामाजिक संघटनांनी प्रशासना विरोधात  आंदोलन करण्याचा इशाराही दिला होता. अखेर शनिवारपासून आयसीयु सुरू होणार आहे. 15 ऑगस्टला विधिवत अतिदक्षता विभागाचे उदघाटन होणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेचा मोठा निर्णय; गोरगरीब आणि गरजू पुणेकरांना मिळणार दिलासा

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: names of the Guardian Minister and the Collector were Exclude from the invitation card