
अमित शहा महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांच्या पायगुणाने महाविकास आघाडीचे सरकार जाईल असे वक्तव्य नारायण राणे यांनी केले होते. त्या बाबत आज बारामतीत शरद पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर पवार यांनी राणे यांच्या वक्तव्याला विनोदाची उपमा देत ते निकाली काढले.
बारामती : ''नारायण राणे हे आमचे जुने सहकारी आहेत प, ते विनोद करतात हे मला माहिती नव्हतं, त्यांच कालच वक्तव्य हा राजकारणातील विनोद आहे, यापेक्षा त्याला जास्त महत्व देण्याच कारण नाही'' अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज नारायण राणे यांच्या वक्तव्याला आपण फार महत्व देत नाही हेच दाखवून दिले. ''अमित शहा महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांच्या पायगुणाने महाविकास आघाडीचे सरकार जाईल'' असे वक्तव्य नारायण राणे यांनी केले होते. त्या बाबत आज बारामतीत शरद पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर पवार यांनी राणे यांच्या वक्तव्याला विनोदाची उपमा देत ते निकाली काढले.
मराठ्यांनी घेतलेला पानिपतचा बदला
कृषी कायद्याबाबत बोलताना पवार म्हणाले, ''अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना कृषी कायद्या संदर्भातील चर्चा 2003 मध्ये सुरु झाली, 2004 ते 2014 या काळात मी कृषीमंत्री होतो, माझ्या काळात या बाबतची चर्चा झाली होती, मात्र फरक असा आहे, घटनेतील तरतूदीनुसार शेती हा राज्यांचा विषय आहे, शेतीबाबतचा कायदा राज्याने करावा यासाठी राज्यातील कृषीमंत्र्यांना बोलावून त्यांची मते मी घेतली व त्याबाबत अभ्यास करुन कायद्याचा मसूदा तयार करण्यासाठी याबाबतची समिती नेमली होती. याबाबतची जबाबदारी इंदापूरचे तत्कालिन मंत्री हर्षवर्धन पाटील व नऊ राज्यातील कृषीमंत्र्यांकडे दिली होती. त्यासमितीने दिलेल्या शिफारसीनुसार मसूदा तयार झाला व तो पुन्हा राज्यातील कृषीमंत्र्यांकडे विचारार्थ पाठविला गेला. त्यानंतर नवीन सरकार आले.
पुण्यात खरेदीसाठी आलेल्या कुटुंबावर काळाचा घाला; डाळज येथे भीषण अपघातात 3 ठार
यात फरक असा आहे की, नवीन सरकारने एकदम कायदाच तयार केला, तो संसदेत आणून गोंधळात मंजूर करुन घेतला. शेवटी कायदा करायचा असेल तर त्या बाबत चर्चा होणे अपेक्षित असते. जो विषय राज्याशी संबंधित आहे, तेथे राज्याला अधिक विश्वासात घ्यायला पाहिजे होते, पण मोदी सरकारने याबाबी दुर्लक्षित करुन थेट कायदाच आणला ही माझी मुख्य तक्रार आहे'' असे शरद पवार म्हणाले. शेतीमध्ये जेथे सुधारणा करणे शक्य आहे, तेथे ती केली पाहिजे, शेतीत सुधारणा करण्याबद्दलची माझी अजिबात तक्रार नाही, काही गोष्टीबाबत नाराजी आहे, मात्र चर्चेतून यात मार्ग निघू शकतो.
"'ज्या वेळेस चार पाच राज्यातील शेतकरी सत्तर दिवस उन, पाऊस थंडी यांचा विचार न करता रस्त्यावर येऊन बसतात, त्या वेळेस सरकार संवेदनशील असले पाहिजे, स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथसिंह किंवा नितीन गडकरी यांच्यासारख्या ज्येष्ठ मंत्र्यांनी यात चर्चा केली पाहिजे,'' अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.
पुण्यात तरुणीची आत्महत्या; विदर्भातील मंत्र्यांशी अफेअरची चर्चा
''पियुष गोयल हे मुंबईचे आहेत, आमचे मित्रही आहेत, पण मला पियुष गोयल आणि शेती या बाबत फारस माहिती नाही, माझ्या ज्ञानात भर पडली की पियुष गोयल हे शेतीच्या विषयातील तज्ज्ञ आहेत'', असा टोलाही पवारांनी लगावला. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन व शेतकऱ्यांची अस्वस्थता विचारात घेतल्यानंतर वरिष्ठांनी यात अधिक गंभीरतेने लक्ष घालायला हवे होते, अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखवली.
पुण्यात खरेदीसाठी आलेल्या कुटुंबावर काळाचा घाला; डाळज येथे भीषण अपघातात 3 ठार