esakal | पुण्यात खरेदीसाठी आलेल्या कुटुंबावर काळाचा घाला; डाळज येथे भीषण अपघातात 3 ठार

बोलून बातमी शोधा

3 killed, 2 injured in accident at Dalaj of family who came to Pune for shopping

अपघाताबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ''ट्रॅक्टर चालक गोरख मल्हारी बिडबाग हे त्यांच्याकडील ट्रॅक्टरमधून( क्र. एम.एच.४५ एफ ७७७९) करमाळा तालुक्यातील केतूर येथील ऊस भरुन पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्गावरुन माळीनगर येथील कारखान्याकडे निघाले होते.

पुण्यात खरेदीसाठी आलेल्या कुटुंबावर काळाचा घाला; डाळज येथे भीषण अपघातात 3 ठार
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

भिगवण : पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर डाळज क्र. २(ता.इंदापुर) येथे फॉर्च्युनर गाडीने ट्रॅक्टरला पाठीमागुन धडक देऊन झालेल्या भीषण अपघातांमध्ये एकाच कुटुंबातील आई, वडील व मुलगा अशा तिघांचा दुदैवी मृत्यू झाला आहे तर मुलगी व चालक जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी (ता.०७) रात्री अकराच्या सुमारास झाला. अपघात इतका भीषण होता की गाडीतील जखमी व मयत यांना अक्षरशः ट्रॅक्टर व क्रेनच्या सहाय्याने गाडीतुन बाहेर काढावे लागले.


गीता अरूण माने (वय ३६), मुकुंद अरुण माने (वय२५) व अरुण बाबुराव माने (वय ४५ रा. सर्व रा लातूर)  यांचा अपघातामध्ये मृत्यू झाला आहे तर साक्षी अरुण माने (वय १८) व चालक महादेव रखमाजी नेटके (वय ५६) हे अपघातांमध्ये गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत ट्रॅक्टर चालक गोरख मल्हारी बिडबाग (रा. संग्रामनगर अकलूज ता. माळशिरस जि सोलापूर)यांनी भिगवण पोलिसांत खबर दिली.

मराठी संशोधकाने दिल्लीतील धुक्याचे उकलले गूढ!

अपघाताबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ''ट्रॅक्टर चालक गोरख मल्हारी बिडबाग हे त्यांच्याकडील ट्रॅक्टरमधून( क्र. एम.एच.४५ एफ ७७७९) करमाळा तालुक्यातील केतूर येथील ऊस भरुन पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्गावरुन माळीनगर येथील कारखान्याकडे निघाले होते. डाळज क्र. २ (ता.इंदापुर) येथे पुण्याहून लातुरकडे निघालेल्या फॉर्च्युनर गाडीने (क्र. एम.एच.२४ ए.टी.२००४)ने ट्रॅक्टर ट्रॉलीस पाठीमागून जोरदार धडक दिल्याने मोठा अपघात झाला. अपघातामध्ये गाडीतील गीता माने, मुकुंद माने व अरुण माने या आई वडील व मुलाचा जागीच मृत्यू झाला तर त्यांची मुलगी साक्षी माने व चालक महादेव नेटके गंभीर जखमी झाले आहे. अपघात इतका भीषण होता की गाडीतील जखमी व मयत यांना अक्षरशः क्रेन व ट्रॅक्टरच्या सहाय्याने गाडीतून बाहेर काढण्यात आले.

अपघातातील जखमी चालकांवर येथील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत तर साक्षी माने हिच्यावर पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अधिक तपास भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुभाष रुपनवर करीत आहेत.

पुण्यात तरुणीची आत्महत्या; विदर्भातील मंत्र्यांशी अफेअरची चर्चा

खरेदी करुन गावी निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला. 
याबाबत अधिक माहीती घेतली असता लातुर येथील माने कुटुंब हे लातुरहून पुणे येथे रविवारी (ता.०७) सकाळी खरेदीसाठी आले होते. खरेदीकरुन रात्री उशिरा पुण्याहुन लातुरकडे निघाले होते. इंदापुर तालुक्यातील डाळज क्र.२ येथे आले असता समोरील ऊस वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून धडक लागुन झालेल्या अपघातांमध्ये आई, वडील व मुलगा यांचा जागीच मृत्यू झाला तर मुलगी गंभीर जखमी झाली आहे. खरेदी करुन गावी निघालेल्या कुटुंबावर काळाने घाला घातल्याची बातमी समजताच शोककळा पसरली व अनेकजण सुन्न झाले.
 

यूपीतील युवकाची पुण्यात हत्या; रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह