Narayangaon : 'ऊसाच्या शेताबाहेर मस्ती करत होते बिबट्याचे बछडे अन्...' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Narayangaon : 'ऊसाच्या शेताबाहेर मस्ती करत होते बिबट्याचे बछडे अन्...'

Narayangaon : 'ऊसाच्या शेताबाहेर मस्ती करत होते बिबट्याचे बछडे अन्...'

sakal_logo
By
रवींद्र पाटे ः सकाळ वृत्तसेवा

पुणे (नारायणगाव) : नारायणगाव परिसरात बिबट्याचे पाळीव प्राण्यांवर हल्ले वाढत आहेत. या भागात बिबट्याची संख्या मोठया प्रमाणात वाढली आहे. आज पहाटे येथील डिंभा डाव्या कालव्या लगत असलेल्या उसाच्या शेतातून दोन बछडे चक्क रस्त्यावर येऊन मस्ती करत असल्याचे दिसून आले. येथील शेतकऱ्यांच्या मुलांनी बछड्यांचे फोटो काढून त्यांना पुन्हा उसाच्या शेतात सोडून दिले.

आज पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास येथील प्रगतीशील शेतकरी लक्ष्मण उर्फ अंबादास दत्तात्रय वाजगे यांच्या उसाच्या शेतातून बिबट्याचे दोन बछडे बाहेर आले. येथील लहानु केदार यांच्या घरासमोर येडगाव धरणाकडे जाणाऱ्या डिंभा डाव्या कालव्या लगतच्या रस्त्यावर येऊन मस्ती करत होते. हे दृश्य पाहून येथील मुलांनी बछड्यांना मोबाईल मध्ये कैद केले. रस्त्यावरून जा ये करणाऱ्या वाहनांचा धोका विचारात घेऊन प्रसंगावधान राखून बछड्यांना पुन्हा ऊसाच्या शेतात सोडून दिले. दरम्यान या बाबतची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी व अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली.या बाबत वनपाल मनीषा काळे म्हणाल्या या भागात या पूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार झाल्या आहेत.

हेही वाचा: Video : गोल्डन बॉय नीरजसह या खेळाडूंचा खेलरत्न पुरस्काराने सन्मान

येथील कोल्हे मळा शिवारात आज पहाटेच्या सुमारास मेंढपाळाच्या वाड्यावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन शेळ्या व एक बोकड ठार झाला आहे. वारूळवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात मेंढपाळाचे शिंगरू जखमी झाले आहे. या दोन्ही घटना आज पहाटे झाल्या आहेत. त्याच वेळी सुमारे दीड महिने वयाचे दोन बछडे रस्त्यावर आढळून आल्याने या भागात बछड्यांसह मादीचे वास्तव्य असल्याचे निष्पन्न झाले आहे.या मुळे लहान मुलांची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. या बाबत वाजगे , लहानू केदार म्हणाले या भागात बिबट्याचे दर्शन नेहमी होत आहे. महिन्याभरात येथील ऊस तोड होणार आहे. या मुळे बिबटे सैरभैर होऊन हल्ले वाढण्याची शक्यता आहे.धोका ओळखून वनविभागाने पूर्व उपाययोजना करावी. नारायणगाव सारख्या शहरी भागालगत अनेक बिबट्यांचे वास्तव्य असल्याने त्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा.

loading image
go to top