

Aggressive Male Leopard Trapped Near Narayangaon
Sakal
नारायणगाव : येथील तरुणावर हल्ला करणारा बिबट्या वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात आज (ता. 17) रात्री जेरबंद झाला. यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. हा बिबट्या पूर्ण वाढ झालेला अंदाजे चार ते पाच वर्षाचा नर बिबट आहे. बिबट्याला वनरक्षक ज्ञानेश्वर पवार,आपदा मित्र सुशांत भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू टीम सदस्य शंतनु डेरे,आदित्य डेरे, उपसरपंच बाबू पाटे,किरण वाजगे,नंदू अडसरे पप्पू भुमकर, स्वप्नील पाटे, ऋत्विक डेरे यांच्या मदतीने माणिक डोह येथील निवारा केंद्रात आज रात्री दाखल केले आहे.