
अर्थमंत्री तुम्हाला मान्य नाही, तर त्यांना बदला. परंतु अशा प्रकारे त्यांना वागणूक देणे हे चुकीचे आहे. हा अर्थमंत्र्यांचा अपमान आहे.
पुणे : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना बाजूला ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा अर्थसंकल्पाचे काम करीत आहेत. हा अर्थमंत्र्यांचा अपमान आहे. त्यामुळे एक फेब्रुवारी रोजी सादर होणारा अर्थसंकल्प हा अर्थमंत्र्यांचा नसून, मोदी-शहा यांचा असले, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
देशाची आर्थिक परिस्थिती, एक फेब्रुवारीला सादर होणारा अर्थसंकल्प या पार्श्वभूमीवर बुधवारी चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत घेतली. त्या वेळी त्यांनी हा आरोप केला. याप्रसंगी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, अभय छाजेड उपस्थित होते. अर्थमंत्रालय आणि अर्थमंत्री हा अर्थसंकल्प सादर करतात. परंतु देशाच्या इतिहासात प्रथमच पंतप्रधान आणि गृहमंत्री हे अर्थमंत्र्यांना डावलून अर्थसंकल्पाची तयारी करीत आहे.
- शेखर गायकवाड पुण्याचे नवे महापालिका आयुक्त; पदभार स्वीकारला
अर्थसंकल्पापूर्वी विविध घटकांच्या बैठका घेण्याची परंपरा आहे. तशा आतापर्यंत पंधरा बैठका झाल्या. परंतु त्या मोदी आणि शहा यांनी घेतल्या. त्यापैकी एकाही बैठकांना सीतारामन उपस्थित नव्हत्या, असे सांगून चव्हाण म्हणाले, ''अर्थमंत्री तुम्हाला मान्य नाही, तर त्यांना बदला. परंतु अशा प्रकारे त्यांना वागणूक देणे हे चुकीचे आहे. हा अर्थमंत्र्यांचा अपमान आहे.''
- पुणे : सुभाषचंद्र बोस यांना भारतरत्न देण्याची मागणी
नोटाबंदी, जीएसटी यांची चुकीच्या पद्धतीने केलेली अंमलबजावणी, काळा पैसा आणण्यात आलेले अपयश, बॅंकांचे गैरव्यवहार यामुळे आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. विकास दर 4.8 टक्क्यांवर आला आहे. बेरोजगारी वाढत चालली आहे. अशी परिस्थितीत राहिली, तर पाच ट्रिलियनची अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी किमान दहा वर्षांचा कालावधी लागेल.
- पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री