नसरापूर-चेलाडी रस्त्याची दुरावस्था, बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

सकाळ वृत्तसेवा
Friday, 7 August 2020

नसरापूर येथे महामार्ग फाटा चेलाडी ते नसरापूर गाव यासाधारण दिड किलो मिटर अंतराच्या टप्प्यात पावसाळ्या आगोदर पासुनच खड्डे पडले असुन आता पडणारया पावसाने हे खड्डे वाढले आहेत रस्त्याच्या दुतर्फा पाणी वाहुन जाण्यासाठी गटार नसल्याने सातत्याने रस्त्या वरुनच पाणी वाहील्याने हे खड्डे पडले आहे. तसेच, रस्त्याच्याकडेला गवत देखिल वाढले असुन येणारया जाणारया वाहनांना याची अडचण होत आहे.

नसरापूर - नसरापूर चेलाडी रस्त्याच्या दुतर्फा गटाराचे काम न झाल्याने पाणी रस्त्यावर वाहुन मोठ मोठ्ठे खड्डे पडले असुन, या बाबत सार्वजनीक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नसरापूर येथे महामार्ग फाटा चेलाडी ते नसरापूर गाव यासाधारण दिड किलो मिटर अंतराच्या टप्प्यात पावसाळ्या आगोदर पासुनच खड्डे पडले असुन आता पडणारया पावसाने हे खड्डे वाढले आहेत रस्त्याच्या दुतर्फा पाणी वाहुन जाण्यासाठी गटार नसल्याने सातत्याने रस्त्या वरुनच पाणी वाहील्याने हे खड्डे पडले आहे. तसेच, रस्त्याच्याकडेला गवत देखिल वाढले असुन येणारया जाणारया वाहनांना याची अडचण होत आहे. गेले अनेक दिवस अशीच परिस्थिती असुन देखिल हा रस्ता ज्या विभागाच्या अखत्यारीत आहे. तो सार्वजनीक बांधकाम विभाग वेल्हेचे अधिकारी या रस्त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नसरापूर ग्रामस्थांनी केला आहे.

पुणे पोलिसांनी गणेशोत्सवाबद्दल घेतला मोठा निर्णय; गणेश मंडळांना केले 'हे' आवाहन!

सार्वजनीक बांधकाम विभागाच्या वतीने रस्त्याच्या दोन्ही बाजुस पावसाचे पाणी वाहुन जाण्यासाठी गटारांचे काम होणे गरजेचे आहे. ज्यामुळे रस्त्यावर पाणी थांबुन खड्डे पडणार नाहीत. मात्र, गेले अनेक दिवस या दुरावस्थेकडे बांधकाम विभागाचे लक्ष नसल्याने दरवेळी भरलेले खड्डे वाहणारया पाण्यामुळे पुन्हा उखडत आहेत

याबाबत सार्वजनीक बांधकाम विभाग वेल्हेच्या अभियंता अश्विनी घोडके यांच्याशी संपर्क साधला असता, या रस्त्याच्या दोन्ही बाजुस झालेल्या रहीवाशीवस्ती मधील सांडपाणी ते रस्त्यावर सोडत असल्याने सातत्याने या भागात रस्ता खराब होत आहे. याबाबत संबधीत ग्रामस्थांवर ग्रामपंचायतीने कारवाई करणे गरजेचे आहे ती होत नाही, पावसाचे पाणी वाहुन जाण्यासाठी येत्या दोन ते तीन दिवसात तात्पुरत्या स्वरुपाचे गटार सार्वजनीक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोना हा उपचाराविना बरा होणारा किरकोळ आजार; झेडपी सभापतींनी सांगितला स्वत:चा अनुभव​

नसरापूर मधील शिवगंगा नदीपुलावर रस्ता चांगला आहे. मात्र, पुलाच्या दोन्ही कठड्याला गवत वाढले असुन, चिखल साचल्याने पुलावर पावसाचे पाणी साठुन राहत आहे. याठिकाणी गवत काढुन साफसफाई होणे गरजेचे आहे. याबाबत माहीती देताना घोडके यांनी सांगितले कि, हा भाग हवेली बांधकाम विभागाकडे गेला असल्याने त्यांना याबाबत माहीती देऊन काम करुन घेतले जाईल.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nasrapur Cheladi Road Condition