NAS : राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणात ९४ टक्के उपस्थिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NAS : राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणात ९४ टक्के उपस्थिती

NAS : राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणात ९४ टक्के उपस्थिती

पुणे : देशाची शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेणाऱ्या राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणासाठी (नॅस) शहर आणि जिल्ह्यातील ९४ टक्के विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. शुक्रवारी (ता.१२) पार पडलेल्या या सर्वेक्षणाची आकडेवारी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे.

हेही वाचा: "आपला देश भगवाच राहिला पाहिजे; तो कधीही हिरवा होता कामा नये"

देश पातळीवर दर तीन वर्षांनी राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणाचे (नॅस) आयोजन करण्यात येते. यंदा आयोजित सर्वेक्षणात पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मिळून २३४ शाळांची निवड करण्यात आली होती. या शाळांमधील एकूण २६८ वर्गांमधील ७ हजार ७९९ विद्यार्थ्यांची गणित, इंग्रजी, सामाजिक शास्त्र, विज्ञान आणि भाषा विषयांची किमान ९० मिनिटे आणि कमाल १२० मिनिटांची प्रश्‍नावली उत्तरांसह भरून घेण्यात आली होती. पुणे शहरातील एक शाळा वगळता सर्व शाळांनी सर्वेक्षणात सहभाग नोंदवला आहे. सर्वेक्षणाच्या आधारे अध्ययन-अध्यापन प्रक्रियेतील अडथळे दूर केले जातात आणि पुढील शैक्षणिक वाटचालीची निश्चितीही केली जाते. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएससी) वतीने देशभरात या चाचणीचे आयोजन करण्यात आले होते.

हेही वाचा: मिलिंद तेलतुंबडेवरील ५० लाखाचं बक्षीस पोलिसांना मिळणार?

सहभागी विद्यार्थी :

इयत्ता : निवडलेल्या शाळा : निवडलेले विद्यार्थी : सहभागी विद्यार्थी : विद्यार्थ्यांची टक्केवारी

तिसरी : ५१ : १३९० : १३३० : ९५.६८

सातवी : ४६ : १३४१ : १२५० : ९३.२१

आठवी : ७८ : २३०७ : २१९० : ९४.९३

दहावी : ९३ : २७६१ : २४४५ : ८८.५५

loading image
go to top