मी गर्भलिंग तपासणी करणार नाही, मुलींची भ्रूणहत्या होऊ देणार नाही..

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 जानेवारी 2020

राष्ट्रीय कन्या सप्ताहानिमित्त दिनांक २० ते २६ जानेवारी या सप्ताहात मुलींच्या सक्षमीकरणासाठी विविध शालेय कार्यक्रम, स्पर्धा, जनजागृती सभा, पथनाट्य, कीर्तन, वृक्षारोपण, विशेष ग्रामसभा, गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार, आशा व अंगणवाडी सेविकांच्या गृहभेटी अशा जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मुंडे यांनी दिली.

पुणे : "मी गर्भलिंग तपासणी करणार नाही, मी मुलींची भ्रूणहत्या होऊ देणार नाही. मी मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करेन...!" अशी शपथ आज जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी उपस्थितांना दिली. निमित्त होते… राष्ट्रीय कन्या सप्ताहाच्या उद्घाटनाचे!

तानाजी चित्रपटासाठी विद्यार्थ्याने चक्क मुख्यध्यापकांना लिहिले....

जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात 'बेटी बचाव बेटी पढाव' योजनेअंतर्गत राष्ट्रीय कन्या दिनानिमित्त राष्ट्रीय कन्या सप्ताहाचे उद्घाटन राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन करण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारी राम यांनी उपस्थितांना 'स्त्री भ्रूण हत्या होऊ देणार नाही..'या आशयाची शपथ देवून स्वाक्षरी फलकावर संदेश लिहून स्वाक्षरी केली.

अन्‌ पोत्यात सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाचे उलगडले रहस्य

कार्यक्रमाला जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी दत्तात्रेय मुंडे, बालविकास प्रकल्प अधिकारी प्रकाश वाघमारे, विस्तार अधिकारी नितीन पवार व सुरेश गुंजाळ तसेच पर्यवेक्षिका व महिला अधिकारी उपस्थित होत्या.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
राष्ट्रीय कन्या सप्ताहानिमित्त दिनांक २० ते २६ जानेवारी या सप्ताहात मुलींच्या सक्षमीकरणासाठी विविध शालेय कार्यक्रम, स्पर्धा, जनजागृती सभा, पथनाट्य, कीर्तन, वृक्षारोपण, विशेष ग्रामसभा, गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार, आशा व अंगणवाडी सेविकांच्या गृहभेटी अशा जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मुंडे यांनी दिली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: National Girls Week begins at the hands of the Collector