Sunetra Pawar's Direct Dialogue: Addressing Corporators' Grievances
sakal
पुणे : उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नगरसेवकांची बैठक घेत पुणेकरांचे प्रश्न जाणून घेतले. यावेळी पक्षाच्या नगरसेवकांनी पवार यांच्यासमोर भाजपकडून निधी देण्यात आखडता हात घेण्यापासून ते दुजाभावाची वागणुकी दिली जात असल्याची गाऱ्हाणी मांडली. त्यावर फक्त विरोधाला विरोध करू नका, पण पुणेकरांच्या प्रश्नासाठी वेळप्रसंगी संघर्षाची तयारी ठेवण्याचाही सल्ला पवार यांनी नगरसेवकांना दिला.