esakal | Budget 2020 : अर्थसंकल्प सादर अन् शेअर बाजारात मोठी घसरण!
sakal

बोलून बातमी शोधा

share-market-down

आज सकाळी बाजार सुरु होताच मुंबई शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये घसरण झाली होती. सेन्सेक्समध्ये 126 अंशाची घसरण झाली होती.

Budget 2020 : अर्थसंकल्प सादर अन् शेअर बाजारात मोठी घसरण!

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

अर्थसंकल्प 2020 : नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज आर्थिक वर्ष 2020-21 साठीचा अर्थसंकल्प सादर केला. या पार्श्वभूमीवर शनिवार असूनदेखील शेअर बाजार सुरू ठेवण्यात आला होता.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मात्र, अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांकडून कोणत्याही विशेष तरतूदींची घोषणा न झाल्यामुळे शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. मुंबई शेअर मार्केटमध्ये सेन्सेक्स 1000 अंशांपेक्षा जास्त अंशांनी घसरला, तर राष्ट्रीय शेअर मार्केटचा निर्देशांक असलेला निफ्टीदेखील 225 अंशांनी घसरला.

एचडीएफसी लाइफ, आयसीआयसीआय प्रू, एसबीआय लाइफ यांच्या सेन्सेक्समध्ये कमालीची घसरण नोंदविली गेली आहे. मुंबई शेअर मार्केटचा निर्देंशांक सेन्सेक्स 40023 अंशांच्या पातळीवर असून निफ्टी 11771 अंशांच्या पातळीवर स्थिरावण्याचा प्रयत्नात आहे.

- Budget 2020 : अर्थव्यवस्थेला उभारी देण्याचा प्रयत्न; प्राप्तीकरातून दिलासा

अर्थमंत्री सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये अपेक्षाभंग झाल्यामुळे शेअर मार्केटमध्ये नाराजीचे वातावरण दिसून आले. एलआयसी बाबत घेतलेला सरकारचा निर्णयही यास कारणीभूत ठरला आहे. आयपीओच्या माध्यमातून सरकार पैसे उभारत असल्याचे अर्थमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले होते. त्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मंदीचे सावट दिसून आले. 

- Budget 2020 : देशात 2025 पर्यंत 100 नवी विमानतळं!

टेक महिंद्रा, पॉवरग्रीड, टाटा स्टील, एनटीपीसी, कोटक बँक आणि एचसीएल टेक यांचे शेअर घसरलेले दिसून आले. तर दुसरीकडे एचयूएल, अल्ट्राटेक सिमेंट, मारुती आणि एशियन पेंट्सच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. 

- Budget 2020 : 'बेटी बचाओ, बेटी पढाओ'ला प्रचंड प्रतिसाद

दरम्यान, आज सकाळी बाजार सुरु होताच मुंबई शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये घसरण झाली होती. सेन्सेक्समध्ये 126 अंशाची घसरण झाली होती.