
धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर लढणा-या आमदार गोपीचंद पडळकर यांची पोलिसांनी मुस्कटदाबी केल्याचा निषेध राष्ट्रवादीचे दौंड तालुका निरिक्षक बापूराव सोलनकर यांनी केला आहे.
बारामती : धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर लढणा-या आमदार गोपीचंद पडळकर यांची पोलिसांनी मुस्कटदाबी केल्याचा निषेध राष्ट्रवादीचे दौंड तालुका निरिक्षक बापूराव सोलनकर यांनी केला आहे. त्यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात पडळकर यांची मुस्कटदाबी होत असल्याचा निषेध केला आहे.
बापरे! पुण्यातील धूलिकणांत झाली तब्बल एवढ्या पटींनी वाढ
या पत्रकात सोलनकर नमूद करतात, आज विधानभवनात आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगर समाजाच्या आरक्षणासह विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. पडळकर यांनी धनगर आरक्षण आणि भाजप सरकारच्या काळात धनगर समाजासाठी 22 योजना लागू केल्या होत्या तसेच 1000 कोटी देण्याची तरतूदही केली होती.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात येऊन वर्ष लोटले तरी या योजनांबाबत सरकारने साधी चर्चाही केली नाही, हा धनगर समाजावर अन्याय आहे. हाच मुद्दा घेऊन पडळकर यांनी धनगर समजाची वेशभूषा परिधान करून ढोल वाजवून आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, परंतु तेथील पोलिसांनी धनगर समाजाच्या मागण्यांचे बोर्ड तोडून टाकले व आंदोलन करण्यास मनाई केली.
लॉकडाउनच्या काळात गीर गाईच्या दुधाला दुप्पट मागणी वाढली
एखादा समाजाचा नेता आंदोलन करत तर पोलिसांनी अशी दडपशाही करणे चुकीचे आहे यामध्ये धनगर समाजाच्या भावना दुखावल्या आहे अशी कृती करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दौंड तालुका निरीक्षक बापुराव सोलनकर यांनी मागणी केली आहे. हा प्रश्न पक्षीय नसून धनगर समाजाच्या भावना यात आहेत, त्या कडे सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे, असेही सोलनकर यांनी नमूद केले आहे.
(संपादन : सागर डी. शेलार)