अजित पवारांना पुण्यात मोठा धक्का; दोन्ही आमदार बैठकीला

ज्ञानेश सावंत
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

भाजपला बहुमत सिध्द करता येणार नसल्याचे सांगत पवार यांनी बंडखोरांना इशारा दिला. त्यामुळे सर्व आमदार पक्षाकडे असतील, असे सांगण्यात आले. तुपे आणि टिंगरे यांना तिकिट देण्यापासून निवडून आणण्यात अजित पवारांचा मोठा वाटा होतो. मात्र त्यात आमदारांनी पाठ फिरवल्याने अजित पवारांना पुण्यात धक्का बसल्याचे मानले जात आहे. 

पुणे : राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली; तेव्हा "रिचेलब' असलेले पुण्यातील राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे आणि सुनील टिंगरे शनिवारी दुपारनंतर मात्र 'नॉट रिचेबल' झाले. परंतु, काही मिनिटांत तुपे आणि टिंगरे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या बैठकीसाठी मुंबईत दाखल झाले. परिणामी, हे दोघे पक्षासोबत म्हणजे, शरद पवारांसोबतच राहणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे अजित पवारांसोबत त्यांचे समर्थकही जायला तयार नाहीत, अशी खोचक प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे. 

बारामती कोणत्या पवारांसोबत? ऐका लोक काय म्हणताहेत...

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील 21 पैकी 10 आमदार राष्ट्रवादीचे असून, त्यापैकी दोघे-तिघे वगळता सर्व आमदार अजित पवार यांचे समर्थक मानले जातात. त्यामुळे भाजपशी सलगी करून उपमुख्यमंत्री पद मिळविलेल्या अजित पवार यांच्यासोबत कोणते आमदार जाणार ? याची राजकीय क्षेत्रात होती. तेव्हा तुपे आणि टिंगरे यांच्याशी संपर्क साधला असता, "पक्षातील घडोमोडी आणि शपथविधीबाबत काहीच कल्पना नसल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, अजित पवारांसोबत जाणार का ? या प्रश्‍नाचे उत्तर देण्यास दोघांनी टाळले. त्यानंतर काही वेळात विधीमंडळ नेतेपदावरून अजित पवार यांची हकालपट्टी झाल्याचे जाहीर करण्यात आले. तसेच, भाजपला बहुमत सिध्द करता येणार नसल्याचे सांगत पवार यांनी बंडखोरांना इशारा दिला. त्यामुळे सर्व आमदार पक्षाकडे असतील, असे सांगण्यात आले. तुपे आणि टिंगरे यांना तिकिट देण्यापासून निवडून आणण्यात अजित पवारांचा मोठा वाटा होतो. मात्र त्यात आमदारांनी पाठ फिरवल्याने अजित पवारांना पुण्यात धक्का बसल्याचे मानले जात आहे. 

पुण्यातील नगरसेवकांचे अजित पवारांना बळ?

या पार्श्‍वभूमीवर तुपे म्हणाले, "शपथविधीचा कार्यक्रम "टीव्ही'वर पाहतो आहे. गेली चार दिवस पुण्यातच आहे. महापौरपदाच्या निवडणुकीसाठी मी आणि टिंगरे महापालिकेत होतो.'' 

इंदापूरचे आमदार भरणे अजित पवारांच्या पाठीशी?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP Leader Chetan Tupe and Sunil Tingre In Mumbai for Meeting with Sharad Pawar