Wed, June 7, 2023
LIVEUpdated Jun 6, 2023
Koyta Gang in Pune : कोयता गँग पुन्हा सक्रिय!, दिवसाढवळ्या थयथयाट, पुणेकरांमध्ये भीतीचं वातावरण
पुण्यातील येरवडा भागामध्ये कोयता गँग पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे. या भागात हातात कोयते घेऊन एका तरुणाचा पाठलाग करतानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. तर पोलिसांनी हातात कोयते घेऊन दहशत माजवल्या प्रकरणी 5 जणांना अटक केली आहे. पुन्हा एकदा कोयता गँगला नियंत्रणात आणण्यासाठीचे आव्हान पुणे पोलिसांसमोर आहे.