esakal | आमदार अनिल भोसले यांची सुटका नाहीच; आता हायकोर्टात जावे लागणार
sakal

बोलून बातमी शोधा

ncp mla anil bhosale bail application rejected

या प्रकरणी योगेश लकडे (वय 39, रा. आंबेगाव) यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बॅंक गैरव्यवहार प्रकरणी 16 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आमदार अनिल भोसले यांची सुटका नाहीच; आता हायकोर्टात जावे लागणार

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

पुणे : शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेतील गैरव्यवहार प्रकरणी विधानपरिषदेचे आमदार अनिल भोसले यांचा जामीन अर्ज दुस-यांदा फेटाळण्यात आला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. व्ही. रोट्टे यांना हा आदेश दिला. दोषारोपपत्रांनतरचाही जामीन नाकारल्याने त्यांना आता उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागणार आहे.

आणखी वाचा - बारामतीनंतर आता पुण्याच पडळकरांविरुद्ध गुन्हा दाखल

या प्रकरणी योगेश लकडे (वय 39, रा. आंबेगाव) यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बॅंक गैरव्यवहार प्रकरणी 16 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसले हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्यांच्या विरोधात प्रथमदर्शनी पुरावा नाही. आम्ही दहा कोटी रुपये भरण्यात तयार आहे. तसेच तपास पूर्ण झाला असून या गुन्ह्याचे दोषारोपपत्र दाखल आहे, त्यामुळे जामीन मंजूर कण्यात यावा, असा युक्तिवाद बचाव पक्षाच्यावतीने करण्यात आला. मात्र आरोपींविरोधात प्रथमदर्शनी सबळ पुरावा आहे. 10 कोटी रुपयांतून काहीच साध्य होणार नाही. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेची किंमत फुगवण्यात आली आहे. पुराव्यात हस्तक्षेप होण्याची शक्‍यता असल्याने त्यांच्या जामीन अर्ज फेटाळावा, अशी मागणी फिर्यादी यांच्या वतीने ऍड. सागर कोठारी यांनी केली. सरकारी पक्षाच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील विलास पठारे यांनी बाजू मांडली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा