रोहित पवार भाजपला म्हणाले, नेत्यांना लगाम घाला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 जानेवारी 2020

वादग्रस्त पुस्तक मागे घेतलं, ही चांगली गोष्ट केली, पण वाद संपला म्हणण्याऐवजी तो निर्माण करायलाच नको होता. तुमचे नेते लोकभावनेला न जुमानता वरिष्ठांना अंधारात ठेवून वागत असतील तर त्यांनाही लगाम घाला.

पुणे : 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' हे पुस्तक भाजपने मागे घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपला लक्ष्य करत तुमच्या नेत्यांना लगाम घाला असे म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटले आहे, की वादग्रस्त पुस्तक मागे घेतलं, ही चांगली गोष्ट केली, पण वाद संपला म्हणण्याऐवजी तो निर्माण करायलाच नको होता. तुमचे नेते लोकभावनेला न जुमानता वरिष्ठांना अंधारात ठेवून वागत असतील तर त्यांनाही लगाम घाला. नेत्यांच्या गुडबुकमध्ये जाण्यासाठी थोर व्यक्तींशी तुलना करण्याऐवजी अन्य मार्ग शोधा.

Breaking : 'वादग्रस्त पुस्तकाशी संबंध नाही'; भाजपचे 'हात वर', तर लेखकाचा माफीनामा 

छत्रपती शिवाजी महाराज महान शासक होते. लोककल्याणासाठी शिवाजी महाराजांनी अथक परिश्रम केले. अनेक शतकानंतरही त्यांची चिरंतन प्रेरणा आजही कायम आहे. त्यांची तुलना इतर कुणाशीही होवू शकत नाही, असे ट्विट केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले होते. त्यावर रोहित पवार यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करणारे वादग्रस्त पुस्तक लेखक जयभगवान गोयल यांनी मागे घेतल्याची माहिती भाजपने दिली आहे.

पुस्तकावरून भाजपची तोंडे ‘म्यान’ झाली म्हणून...; शिवसेनेचा वार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP MLA Rohit Pawar targets BJP on Shivaji Maharaj book