अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिकेंचे प्रश्न लागणार मार्गी; खासदार सुळेंनी केल्या सूचना

सकाळ वृत्तसेवा
Friday, 14 February 2020

गेल्या अनेक वर्षांपासून अंगणवाडी पर्यवेक्षिकांची पदोन्नती रखडली आहे. त्यामुळे हा प्रश्‍न त्वरित मार्गी लागावा, अशी मागणी पर्यवेक्षिकांची सुळे यांच्याकडे केली.

पुणे : जिल्ह्यातील अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविका आणि मदतनिसांना जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत हेल्थकार्ड देण्याची सूचना बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी (ता.14) पुुणे जिल्हा परिषद प्रशासनाला केली आहे. याची येत्या सहा महिन्यात अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अंगणवाड्या आणि सेविकांच्या समस्या जाणून घेऊन, त्यावर उपाययोजना करण्यासाठी सुळे यांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेत आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी ही सूचना केली आहे.

- पुणे : बळीराजाची पोरं म्हणाली, 'प्रेम द्या, प्रेम घ्या...'

या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतरे, महिला व बालकल्याण सभापती पूजा पारगे, समाजकल्याण सभापती सारिका पानसरे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रेय मुंडे, संदीप कोहिनकर, राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर आदी उपस्थित होते.

- Video : खेड-शिवापूर टोलनाका हटाव समितीच्या ४८ जणांना तडीपारीच्या नोटिसा

अंगणवाडी सेविकांच्या आरोग्याची तपासणी होणे महत्त्वाचे आहे. त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार आहे. आरोग्य सेविकांच्या त्यासाठी त्या सर्वांना तातडीने हेल्थकार्ड उपलब्ध करून द्यावे. वर्षातून किमान वर्षातून एकदा तपासणी होणे आवश्‍यक आहे.

याशिवाय पुणे जिल्हा कुपोषणमुक्त करणे, गर्भवतींसाठी विशेष मोहीम आखणे, महिलांना ऍनिमिया मुक्त करणे, कमी वजनाच्या बालकांकडे बारकाईने लक्ष देणे, अंगणवाडी केंद्रांना मागणीनुसार वीज जोडणी देणे, वीज देयकांची ग्रामपंचायतीकडे आगाऊ मागणी करणे, अंगणवाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय करणे आदींबाबत सुळे यांनी यावेळी सूचना केल्या.

- उदयनराजे भोसले राज्यसभेवर? भाजप नेते-अमित शहांच्या दिल्ली भेटीने चर्चांना उधाण!

'पदोन्नतीचा प्रस्ताव पाठवा'

गेल्या अनेक वर्षांपासून अंगणवाडी पर्यवेक्षिकांची पदोन्नती रखडली आहे. त्यामुळे हा प्रश्‍न त्वरित मार्गी लागावा, अशी मागणी पर्यवेक्षिकांनी सुळे यांच्याकडे केली. यासाठी राज्य सरकारकडून धोरणात्मक निर्णय गरजेचे आहे. त्यामुळे या पदोन्नत्तीबाबतचा प्रस्ताव सरकारकडे पाठवा, अशी सूचनाही
खासदार सुळे यांनी यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांना केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP MP Supriya Sule raised a demand to provide health cards to the Anganwadi workers