आंबेगाव तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुका लढण्याची तयारी ताकतीने करा : वळसे पाटील

डी. के. वळसे पाटील 
Sunday, 20 December 2020

“मंचर नगरपंचायत होणार हे निश्चित झाले आहे, नगर विकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई येथे माझ्याकडे वेळ मागितली आहे. दोन दिवसात मंचर नगरपंचायत बाबत संयुक्त पत्रकार परीषद घेणार आहोत.

मंचर : “आंबेगाव तालुक्यात जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणूक सर्व जागा लढविण्याच्या दृष्टीने जोरदार तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी करावी. राज्य पातळीवर अजून ग्रामपंचायत निवडणुका विषयी आघाडी बाबतचा निर्णय झालेला नाही. राज्य स्तरावर आघाडी बाबतचा निर्णय झाला तर त्या निर्णयाप्रमाणे गावपातळीवर निर्णय घेऊ.” असे राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. 

बायकोवर बलात्कार आणि 20 लाखाची खंडणी; काय आहे प्रकरण

मंचर (ता. आंबेगाव) येथे रविवारी (ता.20) ग्रामपंचायत निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकित वळसे पाटील बोलत होते. यावेळी जेष्ट नेते बाबुराव बांगर, वसंतराव भालेराव, कैलास बुवा काळे, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, सुभाषराव मोरमारे, शिवाजीराव लोंढे, प्रकाश घोलप, सभापती संजय गवारी, उपसभापती संतोष भोर, भगवान वाघ, रमेश खिलारी, अंकित जाधव उपस्थित होते.  

वळसे पाटील म्हणाले, “ग्रामपंचायत सदस्य निवडणूक निकालानंतर सरपंच पद आरक्षण जाहीर होणार आहे. त्यामुळे सदस्य निवडणुकीत सर्व जाती धर्माच्या लोकांना प्रतीनिधीत्व द्या. कारण यापूर्वी काही ग्रामपंचायतीत सदस्यांचे बहुमत असूनही आरक्षण लागू झालेला सदस्य आपल्याकडे नसल्याने विरोधकांचा सरपंच झाल्याची उदाहरणे आहेत. कर्तबगार कार्यकर्त्यांना संधी द्या, गटबाजी मतभेद व भांडणे टाळा. जेष्ट व युवकांनी एकत्रित काम करून गावचा पाया भक्कम करा, प्रत्येक पंचायत समिती गणातील ग्रामपंचायत निवडणूकीसाठी  निरीक्षकांच्या नेमणुका केल्या आहेत. निरीक्षक व पुणे जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे यांच्या माध्यमातून निवडणूकीविषयी गाव पातळी वरील प्रश्न मार्गी लावले जातील. यावेळी विष्णू हिंगे, बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांची मनोगते झाली. 

विद्यार्थी-पालकांसाठी महत्त्वाची बातमी; परीक्षा फी वाढीला पुणे विद्यापीठाने लावला ब्रेक​
      
“मंचर नगरपंचायत होणार हे निश्चित झाले आहे, नगर विकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई येथे माझ्याकडे वेळ मागितली आहे. दोन दिवसात मंचर नगरपंचायत बाबत संयुक्त पत्रकार परीषद घेणार आहोत. निवडणूक आयोगाने मंचर ग्रामपंचायतीची निवडणूक पुढे ढकलली असा निर्णय होईपर्यंत कार्यकर्त्यांनी गाफील न राहता निवडणूकीची तयारी कायम ठेवावी.”


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP workers should prepare for Gram Panchayat elections in Ambegaon said Walse Patil