राजगुरूनगर शहराच्या प्रतिबंधित क्षेत्राबाबत योग्य तो निर्णय आजच होणार

The right decision regarding the restricted area of ​​Rajgurunagar city will be taken today
The right decision regarding the restricted area of ​​Rajgurunagar city will be taken today

कडूस : साडे चार महिने कोरोनामुक्त राहिलेल्या राजगुरूनगर शहरात सध्या कोरोनाचा फैलाव वेगाने वाढत आहे. खेड तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्हचा आकडा 280 पर्यंत पोहचला आहे. तालुक्यातील हा फैलाव रोखण्यासाठी विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी स्वतः लक्ष घातले आहे. त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी संपर्क साधून खेड तालुक्यातील कोरोना फैलावाबाबत चिंता व्यक्त केली. तसेच फैलाव रोखण्यासाठी त्यांनी काही सूचना प्रशासनाला दिल्या.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

साडेचार महिने कोरोनामुक्त राहिलेल्या राजगुरूनगर शहरात गेल्या आठवड्यात कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर शहरातील कोरोना रुग्णांत वेगाने वाढ होत आहे. सध्या शहरात कोरोनाचे 30 रुग्ण सापडले आहेत. त्यातील काही जण राजगुरूनगर सहकारी बँकेचे कर्मचारी आहेत, तर बाकीच्यांना संपर्कात आल्याने कोरोनाची लागण झाली आहे. तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्हचा आकडा 280 पर्यंत गेला आहे. कोरोनाचा फैलाव वाढू लागल्यानंतर जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शनिवारी (ता.4) राजगुरूनगर शहराला भेट दिली होती. ग्रामस्थ, विविध संघटना व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसमवेत बैठक घेतली. यात मायक्रो कंटेन्मेंट झोन न करता संपूर्ण राजगुरूनगर शहर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्याची मागणी काही संघटना व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी केली होती. याला प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर सुद्धा शहरातील पॉझिटिव्हच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. 

हवेलीकरांच्या काळजीत पडली भर; तालुक्‍यातील २० गावे होणार सील! 

प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर शिवसेना महिला आघाडीच्या सहसंपर्क प्रमुख विजया शिंदे व कार्यकर्त्यांनी विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांच्या कानावर शहरातील वाढत्या कोरोना रुग्णांची समस्या घातली. त्या अनुषंगाने गोऱ्हे यांनी बुधवारी (ता.8) जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी संपर्क साधून तालुक्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. तसेच अन्य काही उपाययोजनांबाबत सूचना सुद्धा केल्या. प्रसाद यांनी गोऱ्हे यांना कोरोनाच्या सद्यस्थितीबाबत सविस्तर माहिती दिली. 'राजगुरूनगर शहरासह तालुक्यातील कोरोना रुग्णांत आणखी भर पडू नये म्हणून प्रशासन प्रयत्न करीत आहे. पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची तपासणी केली जात आहे. राजगुरूनगर शहराच्या प्रतिबंधित क्षेत्राबाबत योग्य तो निर्णय आजच घेतला जाईल,' असे प्रसाद यांनी गोऱ्हे यांना सांगितले. गोऱ्हे यांनी ही माहिती शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना दिली व प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन केले असल्याचे विजया शिंदे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com