

Manisha Mandhare, a professor from Modern College Pune, suspended after CBI arrest in NEET paper leak investigation.
esakal
नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआयने अटक केलेल्या मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स, पुणे येथील प्राध्यापिका मनीषा मांढरे यांच्यावर कॉलेज प्रशासनाने निलंबनाची कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. मॉडर्न कॉलेज प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सीबीआयच्या अटकेनंतर संस्थेच्या नियमांनुसार मांढरे यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे. त्यांना तात्पुरते निलंबित करण्यात येईल, असे कॉलेज सूत्रांनी सांगितले.