मोबाईल शॉपीवर डल्ला मारणारा नेपाळी चोरटा जेरबंद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

बुधवारी (ता.5) देहूरोडमधील सेंट्रल चौक येथे एकजण चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी साही याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने त्याचे एका मित्रासह जानेवारी महिन्यामध्ये सोमाटणे फाटा येथे एक मोबाईल शॉपी फोडल्याचे सांगितले.

पिंपरी : मोबाईल शॉपी फोडणाऱ्या नेपाळी चोरट्याला गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून अडीच लाखांचा ऐवज जप्त केला आहे. जनककुमार विक्रम साही (वय 38, रा. डायमंड बिल्डींग, सेक्‍टर 16, राजे शिवाजीनगर, फ्लॉट क्र 44 चिखली, मूळ-नेपाळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

निगडीत तरूणांवर कोयत्याने वार करुन केली घरांची तोडफोड: चौघांवर गुन्हा दाखल

बुधवारी (ता.5) देहूरोडमधील सेंट्रल चौक येथे एकजण चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी साही याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने त्याचे एका मित्रासह जानेवारी महिन्यामध्ये सोमाटणे फाटा येथे एक मोबाईल शॉपी फोडल्याचे सांगितले. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आरोपीकडून एक लॉपटॉप, दहा मोबाईल व गुन्हयामध्ये वापरलेली दुचाकी गाडी असा एकूण दोन लाख 58 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

तुझे लग्न झालेले आहे, तरीही आपण...

दुसऱ्या एका कारवाईमध्ये युनिट पाचच्या पथकाने आणखी दोन मोबाईल चोरट्यांना जेरबंद केले. यामध्ये एका विधीसंघर्षग्रस्त बालकासह अब्दुल शब्बीर अब्दुल कादर शेख (वय 20, सध्या रा. भारतनगर बांद्रा ईस्ट मुंबई, मूळ- प्रगती कॉलनी बी, विकासनगर, देहुरोड) यांचा समावेश आहे. हे दोघे चोरीचा मोबाईल विक्री करण्यासाठी आले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्यांना ताब्यात घेवून सखोल तपास केला असता त्यांनी त्यांचा मित्र अनिकेत (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) यांनी मिळून काही दिवसांपुर्वी देहूरोड येथील लेखा फार्म येथे एका व्यक्तीकडील मोबाईल चोरल्याची कबुली दिली. याबाबत देहूरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून या आरोपींकडून वीस हजार रूपये किंमतीचे दोन मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत.
चक्क झेडपी शाळेसाठी विद्यार्थ्यांचे वेटिंग, कुठे आहे ही शाळा?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nepali Thief Arrested for theft in mobile shopee in Pimpri