'टेस्ला'ला येणार ‘पाय-कार’चा पर्याय; डॉ. विजय भटकर यांची कराराविषयी मोठी घोषणा

PIE_Car
PIE_Car
Updated on

पुणे : ऊर्जेचा अमर्याद स्रोत म्हणून नव्यानेच सिद्ध झालेल्या न्यूट्रिनो एनर्जीकडे पाहिले जात आहे. ऊर्जेच्या या स्रोतापासून विद्युत ऊर्जा मिळवण्यासाठी `न्यूट्रिनो व्होल्टाईक घट’ तयार करण्यासाठी जर्मनीच्या न्यूट्रिनो एनर्जी ग्रुपसोबत पुण्यातील सेंटर फॉर मटेरिअल्स फॉर इलेक्ट्रॉनिकने (सी-मेट) सहकार्य करार केला आहे. यातूनच पुढे टेस्लाच्या धर्तीवर न्यूट्रिनो एनर्जीवाली ‘पाय-कार’ विकसित करण्यात येणार आहे. 

सी-मेट स्थापनादिनी आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत कराराची अधिकृत घोषणा ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि नालंदा विद्यापीठाचे कुलपती डॉ. विजय भटकर यांनी केली आहे. वेबिनारच्या माध्यमातून आयोजित या कार्यक्रमाला जर्मनीतील ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. होलगर थॉर्स्टेन, सी-मेटचे महासंचालक डॉ. भारत काळे उपस्थित होते. न्यूट्रिनो कणांपासून विद्युत ऊर्जा मिळविणे, ही मानवी इतिहासाला कलाटणी देणारी घटना असेल, असे मत डॉ. भटकर यांनी व्यक्त केले. या सहकार्य कराराच्या माध्यमातून संशोधन आणि विकासाची कामे केली जाणार असून, त्यातील स्वामित्व हक्क आणि संशोधनाचे हस्तांतरणासंबंधी नियम निश्चित करण्यात आले आहेत. 

सहकार्य कराराचे वैशिष्ट्ये :
- जर्मनीच्या गटाला इलेक्ट्रॉनिक्स पदार्थ, क्वाँटम डॉट्स, द्वीमितीय पदार्थांच्या संशोधनासाठी सी-मेट सहकार्य करणार 
- सी-मेटमधील शास्त्रज्ञ न्यूट्रिनो व्होल्टाईक घटासाठी विविध पदार्थांची चाचणी करणार 
- संशोधनाचे भविष्यातील स्वामित्व हक्क आणि उत्पादनासाठी सहकार्य करारात विशेष तरतूद 
- न्यट्रिनो एनर्जीच्या वापरातून चालणारी ‘कार’ अर्थात ‘पाय-कार’ विकसित करण्यात येणार

कराराचे फायदे : 
- जगाचे आर्थिक आणि सामाजिक चित्र बदलणाऱ्या या भविष्यकालीन ऊर्जास्त्रोतांचे स्वामित्व हक्क भारताकडे येईल. 
- ऊर्जेची वाढती गरज भागविण्यासाठी नवीनतम, पर्यावरणपूरक आणि अमर्याद ऊर्जास्रोतांचा नवीन पर्याय उपलब्ध होईल. 
- संशोधन संस्थांबरोबरच उद्योग, तरुण आदींना फायदा होईल.

काय आहे न्यूट्रीनो एनर्जी? 
न्यूट्रिनो छोटा तटस्थ मूलभूत कण आहे. सूर्यगर्भातील आण्विक प्रक्रियांद्वारे इलेक्ट्रॉन प्रक्रियांतून न्यूट्रिनोंची सतत निर्मिती होत असते. वैश्विक किरणांच्या भडिमाराने वातावरणाच्या वरच्या थरात इलेक्ट्रॉन तसेच म्युऑन यांच्यातील प्रक्रियांतून न्यूट्रिनोंची निर्मिती निरंतर चालू असते. दर सेकंदाला मानवी शरीरातून तब्बल ५०० खर्व न्युट्रिनो पार होत असतात. दिवसरात्र उपलब्ध असलेल्या या न्यूट्रिनोंना विशिष्ट प्रकारच्या पदार्थांवर आदळून त्यांच्यातील ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करता येते, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. 

मर्यादा : 
- प्रायोगिक तत्त्वावरील हे संशोधन अजून प्रत्यक्ष वापरात नाही. 
- आर्थिकदृष्ट्या हे तंत्रज्ञान सामान्यांना परवडेल का? याबद्दल पुरेशी माहिती नाही.

‘‘न्यूट्रिनोतून प्राप्त ऊर्जा विविध कार्यांसाठी वापरली जाऊ शकते. व्होल्टाईक घट बनविण्यासाठी देशभरातील शास्त्रज्ञांनी एकत्र यावे. सी-मेटची यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका आहे. डॉ.काळे आणि डॉ. होलगर यांचा गट टू-डी नॅनो मटेरीयलवर संशोधन करत आहे.’’ 
- डॉ. विजय भटकर, ज्येष्ठ संगणक शास्त्रज्ञ

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Tenant Verification
Maharashtra Latest Marathi News Live Update
NCP leader Ganesh Yadav rejected allegations against Devdatt Nikam, claiming they are an attempt to divert attention from the milk adulteration issue.
Notional Increment Approved for Retired Teachers Bombay High Court Decision Brings Pension and Gratuity Relief
Marathi News Esakal
www.esakal.com