esakal | तुटलेले चेंबर आणि फाटलेले रस्ते दुरुस्तीला मुहूर्त कधी
sakal

बोलून बातमी शोधा

Pune

तुटलेले चेंबर आणि फाटलेले रस्ते दुरुस्तीला मुहूर्त कधी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कॅन्टोन्मेंट : रस्ते आणि चेंबर दुरुस्तीचे काम कधी संपेल हे सांगता येणार नाही. मात्र, तुटक्या चेंबर आणि फाटलेल्या रस्त्यामुळे पादचारी आणि वाहनचालकांच्या जीविताला धोका वाढला आहे, ही बाब प्रशासन अद्यापही गांभीर्याने घेत नसल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.

भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत रस्त्यावरील तुटके चेंबर आणि फाटलेल्या रस्त्याची दुरुस्ती येत्या आठवड्यभरात केली नाही, तर वाहनचालक चेंबरमध्ये वाहने अडकवून निषेध करतील असा इशारा दुचाकी आणि चारचाकी चालकांनी दिला आहे. मागिल पंधरा दिवसांत भवानी पेठेतील गुरुनानक नगर रस्त्यावर दोन वेळा चारचाकी वाहने चेंबरमध्ये अडकली तर पादचाऱ्यांना दररोज अपघात होत आहेत. पालिका प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे तुटके चेंबर आणि फाटलेल्या रस्त्यावरून वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे, तर पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून चालण्याची वेळ आली आहे.

हेही वाचा: नारीच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात

पालिका प्रशासनाने चेंबर आणि रस्ते दुरुस्तीचे काम हाती घेतले की, स्वयंघोषित नेत्यांसह स्थानिक लोकप्रतिनिधी फ्लेक्सबाजी करून टेंभा मिरविण्याचे काम करतात. प्रत्यक्षात काम करा असे सांगण्यासाठी कोणीही पुढे येत नाही. माजी मंत्री, आमदार, नगरसेवक, पालिकेमध्ये मोठमोठ्या पदावर या परिसरातील लोकप्रतिनिधी आहेत. त्यांच्याकडून ही कामे का होत नाहीत, अशी विचारणा नागरिकांकडून केली जात आहे. फ्लेक्सबाजी करून धन्यता मानण्यापेक्षा काम करून नागरिकांकडून वाहवाह मिळविली पाहिजे. मात्र, तसे होताना दिसत नाही, अशी खंत मतदारराजाकडून व्यक्त केली जात आहे.

loading image
go to top