
लोणी काळभोर (पुणे): कोरोना प्रादुर्भावानंतर उच्च शिक्षणात अनेक बदल होणार आहेत. या बदलाकडे संधी म्हणून पाहण्याची गरज आहे. सरकारने नवीन शैक्षणिक धोरणात गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि संशोधनाच्या संदर्भात बहुआयामी शिक्षण प्रणाली राबविण्याचे धोरण आखले आहे. यामुळे यापुढील काळात शिक्षकांनी अधिक सर्जनशील होऊन वेगवेगळ्या विषयांवरील सखोल माहिती विद्य़ार्थ्यांना प्रदान करावी लागेल, असे मत भारतीय अंतराळ संशोधन संघटनेचे (इस्त्रो) माजी अध्यक्ष आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2019 च्या मसुदा समितीचे अध्यक्ष पद्मविभूषण डॉ. कृष्णस्वामी कस्तुरीरंगन यांनी वेबिनारमध्ये व्य़क्त केले.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
लोणी काळभोर येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ''उच्च शिक्षणातील बदलत्या प्रतिमानांची शक्यता आणि आव्हाने'' या विषयावरील राष्ट्रीय वेबिनारमध्ये प्रमुख वक्ते या नात्याने बोलतांना डॉ. कृष्णस्वामी कस्तुरीरंगन यांनीवरील मत व्यक्त केले. यावेळी एमआयटी एडीटी विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड यांनी या वेबिनारमध्ये सहभाग घेतला होता.
पुणे- पेठांमधील एका वॉर्डमध्ये किती पाऊस पडतो, त्याचे अचूक मोजमाप करणे आता शक्य
यावेळी बोलतांना डॉ. के. कस्तुरीरंगन म्हणाले, ''भारत सरकार विद्यार्थी केंद्रीत शैक्षणिक धोरण आखत आहे. यात विद्यार्थ्यांचा सर्वसमावेशक (व्हॉलिस्टिक) विकास साधण्याचा हेतू आहे. सध्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याचे आव्हान असले तरी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करून समग्र विकास साधता येईल. उच्च शिक्षणात शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात समतोल राखावा लागेल. देशातील 900 हून अधिक विद्यापीठांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणासह संशोधनाला महत्व द्यावे. त्यासाठी पायाभूत सुविधांची निर्मिती करावी. 2030 पर्यंत प्रत्येक जिल्ह्यात बहुआयामी उच्च शिक्षण देणाऱ्या संस्था उभ्या राहतील. त्यातून विद्यार्थ्यांचा समग्र विकास आणि उदारमतवादी शिक्षणास प्रोत्साहन देण्यात येईल.
किरण राज यादव बारामती नगरपालिकेचे नवे मुख्याधिकारी
डॉ. के. कस्तुरीरंगन पुढे म्हणाले, ''भविष्यात शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरण होणार असून आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देण्याचे आव्हान देशातील शिक्षण संस्थांच्या समोर असणार आहे. विद्यापीठांनी अभ्यासक्रमात बदल करून व्यावसायिक शिक्षणात विद्यार्थांचा सहभाग वाढविण्याची गरज आहे. माहिती तंत्रज्ञानामुळे शिक्षणाचा प्रसार, शिक्षणाचा विस्तार, शिक्षणाचा दर्जा, शिक्षणाची संधी वाढविण्यास भरपूर वाव आहे.''
"आइन्स्टाईन'च्या सिद्धांताची झाली परीक्षा; गुरुत्वीय लहरींचा अभ्यास
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.