पुण्यात भाजपचे कमळ पूर्ण फुलेना; कार्यकारिणीवर आहे दादा-भाऊंचे वर्चस्व

ब्रिजमोहन पाटील
Wednesday, 12 August 2020

शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी जाहीर केलेल्या १२ उपाध्यक्ष, ५ सरचिटणीस आणि ११ चिटणीस या पदाधिकाऱ्यांमध्ये चंद्रकांत पाटील आणि गिरीश बापट यांच्या कार्यकर्त्यांची संख्या जास्त आहे.

पुणे : शहर भाजपला नवे शहराध्यक्ष मिळून जवळपास आठ महिने होत आले तरी नवीन कार्यकारिणी अद्याप जाहीर झालेली नाही. बुधवार (ता.१२) उपाध्यक्ष, सरचिटणीस आणि चिटणीस या तीन पदांवरील नियुक्त्या पक्षाने जाहीर केल्या. मात्र, अजून अनेक पदांवरील नियुक्त्या झालेल्या नाहीत. दरम्यान, नव्याने नियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांवरून शहर भाजपवर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि खासदार गिरीश बापट यांचे वर्चस्व दिसून आले आहे. 

पुण्यातील जम्बो हॉस्पिटलचं काम युद्धपातळीवर सुरू; आठवडाभरात रुग्णांच्या सेवेत!​

विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने आमदार माधुरी मिसाळ यांच्याकडील शहराध्यक्षपद माजी आमदार जगदीश मुळीक यांच्याकडे दिले. मुळीक यांना शहराध्यक्षपद देऊन भाजपने प्रस्थापितांना धक्का दिल्याचे मानले जात होते. दरम्यान, दीड महिन्यापूर्वी चार सरचिटणीसांची नियुक्ती करण्यात आली होती, त्यात आज नगरसेवक दीपक पोटे यांचीही या पदावर वर्णी लागली आहे. 

कर्तव्य बजावत वर्दीतला माणूस वाढवतोय कोरोना रुग्णांचं मनोधैर्य!​

शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी जाहीर केलेल्या १२ उपाध्यक्ष, ५ सरचिटणीस आणि ११ चिटणीस या पदाधिकाऱ्यांमध्ये चंद्रकांत पाटील आणि गिरीश  बापट यांच्या कार्यकर्त्यांची संख्या जास्त आहे. तसेच शहराध्यक्ष मुळीक, आमदार मिसाळ व खासदार संजय काकाडे यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांनाही संधी देण्यात आली आहे. मात्र, भाजप कार्यकारिणीतील इतर पदांवरील नियुक्ती अद्याप झालेल्या नाहीत. 

शहराध्यक्ष मुळीक म्हणाले, " आज उपाध्यक्ष, सरचिटणीस व चिटणीस पदांवरील पदाधिकारी जाहीर केले आहेत. इतर पदाधिकारी ही लवकरच जाहीर केले जातील."

प्रशासक नियुक्तीवरून महाआघाडी सरकारला ३४ याचिकांचे आव्हान

नियुक्ती केलेल्या पदाधिकाऱ्याची यादी पुढील प्रामाणे :- 

उपाध्यक्ष :-
हरिदास चरवड, दिनेश उर्फ पिंटू धाडवे, मानसी देशपांडे, भूषण तुपे, संतोष राजगुरू, योगेश बाचल, गणेश कळमकर, सुनील मारणे, श्रीपाद ढेकणे, दिलीप काळोखे, डॉ. संदीप बुटाला, रमेश काळे  

सरचिटणीस :- 
राजेश पांडे, गणेश घोष, राजेश येनपुरे, दीपक नागपुरे, दीपक पोटे

चिटणीस :- 

गायत्री खडके, प्रशांत हरसुले, चंद्रकांत पोटे, किरण बारटक्के, मंगला ढेरे, कोमल शेंडकर, हरीश निकम, संदीप लोणकर, अनिता तलाठी, सुनील माने, निलेश कोंढाळकर

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new executive has not been announced yet by Pune city BJP