पुण्यातील जम्बो हॉस्पिटलचं काम युद्धपातळीवर सुरू; आठवडाभरात रुग्णांच्या सेवेत!

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 12 August 2020

या ठिकाणी दोन मोठे तंबू उभारण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. तर आयसीयूच्या दोनशे खाटांच्या तंबूमध्ये फ्लोअरिंगचे काम वेगाने पूर्ण केले जात आहे. या ठिकाणी निर्माण केल्या जाणाऱ्या ऑक्‍सिजन खाटा पूर्णतः वातानुकूलित यंत्रणेसह सज्ज असतील.

पुणे : कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचारांसाठी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या (सीओईपी) मैदानावरील जम्बो रुग्णालयाची तयारी वेगाने सुरू आहे. सात हजार पस्तीसशे चौरस मीटर जागेवर उभारण्यात येत असलेल्या या रुग्णालयात ऑक्‍सिजन आणि आयसीयूच्या आठशे खाटा असणार आहेत. १९ ऑगस्टपर्यंत हे रुग्णालय कार्यान्वित करण्यात येणार आहे. 

पुण्याच्या सुवर्णकन्येला नेदरलॅंडच्या डेल्फ विद्यापीठाची स्कॉलरशिप!​

गेल्या महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुण्यात येऊन आढावा घेतला होता. त्यावेळी मुंबईप्रमाणे पुण्यातही जम्बो रुग्णालय निर्माण करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले होते. पुणे आणि पिंपरीत प्रत्येकी आठशे खाटांच्या दोन रुग्णालयांचे काम सुरू करण्यात आले आहे. शहरासाठी सहाशे ऑक्‍सिजन आणि दोनशे आयसीयू खाटांचे रुग्णालय सीओईपीच्या मैदानावर तयार केले जात असून सध्या युद्धपातळीवर हे काम केले जात आहे.

कर्तव्य बजावत वर्दीतला माणूस वाढवतोय कोरोना रुग्णांचं मनोधैर्य!​

या ठिकाणी दोन मोठे तंबू उभारण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. तर आयसीयूच्या दोनशे खाटांच्या तंबूमध्ये फ्लोअरिंगचे काम वेगाने पूर्ण केले जात आहे. या ठिकाणी निर्माण केल्या जाणाऱ्या ऑक्‍सिजन खाटा पूर्णतः वातानुकूलित यंत्रणेसह सज्ज असतील. त्यासाठीच्या यंत्रणांचे काम बुधवारपासून सुरू करण्यात आले आहे. पुढील चार ते पाच दिवसांत येथील सर्व व्यवस्था सज्ज ठेवण्याचे आदेश पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) ही सर्व व्यवस्था निर्माण करणाऱ्या दीपाली डिझाईन्स अँड एक्‍झिबिट्‌स यांना दिले आहेत. 

बाप रे! पुणे जिल्ह्यात ऑगस्टअखेर होणार कोरोना रुग्णांची 'एवढी' संख्या

या ठिकाणी आठशे खाटांसह रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्‍टर्स आणि त्यांची देखभाल करणाऱ्या नर्स आणि वॉर्डबॉय यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था तयार केली जात आहे. त्याशिवाय विविध प्रकारच्या चाचण्या-तपासण्या, औषधे, प्रयोगशाळा यांची निर्मिती केली जाणार आहे. पीएमआरडीएचे आयुक्त सुहास दिवसे आणि नगर नियोजनकार विवेक खरवडकर यांनी बुधवारी (ता.१२) कामाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली.

त्यावेळी दिवसे म्हणाले, "पुणे आणि भोसरी येथील दोन्ही रुग्णालयांचे काम १९ ऑगस्टपूर्वी पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. या रुग्णालयासाठी पायाभूत सुविधांसह महावितरण, पाणीपुरवठा, मैलापाणी व्यवस्था यांचे काम विविध सरकारी संस्थांच्या समन्वयातून केले जात आहे.''

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Preparations are in full swing for a jumbo hospital to be set up on the ground of COEP