गावांच्या समृद्धीसाठी आता रोजगार हमीची नवी 'चतुसुत्री'! 

Employment-Guarantee-Scheme
Employment-Guarantee-Scheme

पुणे - महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आता गावांच्या समृद्धीसाठी मदतीचा हात देणार आहे. यासाठी रोजगार हमीच्या कामांची नवी चतुसुत्री तयार करण्यात आली आहे. यामध्ये जल, जीवन, वृक्ष आणि समृद्धीचा समावेश करण्यात आला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यामुळे गावांना आता रोजगार हमी योजनेतून व्यक्तीगत कामे आणि सामुदायिक विकासकामे करता येणार आहेत. यामुळे बेरोजगार आणि शेतमजुरांना आपापल्या गावातच रोजगार उपलब्ध होऊ शकणार आहे. यामुळे मागेल त्याला काम हे रोजगार हमी योजनेचे नवे सुत्र असणार आहे.

यासाठी गावांच्या सर्वांगीण विकासासाठी जलसंधारण आणि कृषीविषयक कामांना अधिक प्राधान्य दिले जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचे शेतीचे उत्पादन दुप्पट होण्यास मदत होणार आहे. शिवाय गावातच रोजगार उपलब्ध झाल्याने रोजगारासाठी मजुरांचे शहरांकडे होणारे स्थलांतर थांबू शकेल. पर्यायाने केवळ स्थलांतरामुळे मजुरांच्या मुलांचे होणारे शैक्षणिक नुकसान टळू शकणार आहे.

यासाठी आपापल्या गावांच्या विकासासाठीचे २०२१-२२ या वर्षाचे कृती आराखडे आणि २०२०-२१ चे पुरक आराखडे तयार करण्याचा आदेश राज्य सरकारने सर्व ग्रामपंचायतींना दिला आहे. या आराखड्याबरोबरच आपापल्या गावचे लेबर बजेट. तयार करण्याचे गावांना सांगण्यात आले आहे. अशा पद्धतीने रोजगार हमी योजनेच्या कामांचे विकास आराखडा तयार करण्याचा अधिकार यंदा पहिल्यांदाच ग्रामपंचायतींना मिळाला आहे.

रोजगार हमीतून २६४ कामे 
गावांच्या विकासासाठी उपयुक्त आणि आवश्यक असलेल्या २६४ कामांची यादी निश्चित करण्यात आली आहे. ही कामे चार स्वतंत्र प्रवर्गात विभागण्यात आली आहेत. यांना प्रवर्ग अ, ब, क आणि ड असे नाव देण्यात आले आहे. अ प्रवर्गात नैसर्गिक साधनसंपत्तीबाबतची सार्वजनिक कामे, ब संवर्गात दुर्बल घटकातील व्यक्तींबाबतची वैयक्तिक लाभाची कामे, क संवर्गात शेती आणि जलसंधारणविषयक कामे आणि ड संवर्गात ग्रामीण पायाभूत सुविधांची कामे करण्यात येणार आहेत.

शेतीची करावयाची कामे 
- माथा ते पायथा ओघळ सनियंत्रण उपचार कामे
-  लहान माती नाला बांध 
- अनघडी दगडी बांध बांधणे.
- माती नाला बंधारे बांधणे.
- सिमेंट नाला बांध गेटेड बंधारा. 
- कोल्हापुरी बंधारा
- नाला  खोलीकरण करणे, गाळ काढणे.
- सलग समतर चर खोदणे.
- कंपार्टमेंट बंडीग करणे.
- शेततळे बांधणे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com