

State Approves ₹33 Crore Government Guest House Project in Pune
Sakal
प्रसाद कानडे
पुणे: शहराचा वाढता विस्तार अन् सतत असणाऱ्या अति महत्त्वाच्या व्यक्तींचा (व्हीआयपी) वाढता राबता लक्षात घेता नवीन शासकीय विश्रामगृहाची आवश्यकता होती. हे लक्षात घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने लष्कर परिसरातील शासकीय विश्रामगृह क्रमांक २ (आयबी) ची जुनी इमारत पाडून तेथे अत्याधुनिक आणि सोयीसुविधांयुक्त नवीन इमारतीच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. सुमारे ३० हजार चौरस फूट जागेवर सुमारे ३३ कोटी रुपये खर्चून नवीन इमारत बांधली जात आहे. यात ४८ कक्ष असून ते महत्त्वाच्या व्यक्तींपासून सामान्य नागरिकांसाठी उपलब्ध राहणार आहेत. दीड वर्षात या इमारतीचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.