सरकारी रुग्णालयांतील संभाव्य आगीच्या घटना टाळण्यासाठी नव्याने मार्गदर्शक सूचना जारी

अग्निशमन यंत्रांचा वापर कसा करावा, याचे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देणे अनिवार्य केले आहे.
 hospital fire
hospital fire sakal

पुणे: सरकारी रुग्णालयांतील संभाव्य आगीच्या घटना टाळण्यासाठी राज्य सरकारने नव्याने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचा आदेश सर्व रुग्णालयांना दिला आहे. या आदेशानुसार यापुढे रुग्णालयांतील सर्व कर्मचाऱ्यांना दर तीन महिन्यांतून एकदा मॉक ड्रिलच्या माध्यमातून आग प्रतिबंधक उपाययोजनांचे प्रशिक्षण देणे बंधनकारक करण्यात आले आहे. या मॉक ड्रिलमध्ये कर्मचाऱ्यांनी रुग्णालयातील उपलब्ध अग्निशमन यंत्रांचा वापर कसा करावा, याचे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देणे अनिवार्य केले आहे.

 hospital fire
नव्या रूपातील डेक्कन क्वीन मुंबईत लवकर होणार दाखल

आरोग्य कर्मचाऱ्यांना हे प्रशिक्षण देतेवेळी स्थानिक अग्निशमन अधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्यांचा सहभाग असणेही बंधनकारक असणार आहे. गेल्या वर्षभरात राज्यातील राज्यातील काही सरकारी रुग्णालयांमध्ये आगीच्या दुर्घटना घडल्या होत्या. या दुर्घटनांमध्ये अनेक रुग्णांचा आगीत जळून मृत्यू झाला होता. याला आळा घालण्यासाठी आणि आगीच्या संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी याआधी रुग्णालयांचे फायर आॅडिट

करण्याचा आदेश सर्व रुग्णालयांना दिला होता. यामध्ये आढळून आलेल्या त्रुटींची पुर्तता व्हावी आणि संभाव्य आगीच्या घटना टाळता याव्यात, या उद्देशाने राज्याच्या आरोग्य विभागाने या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

 hospital fire
डेक्कन क्वीनच्या ‘व्हिस्टाडोम कोचवर प्रवाशाची नाराजी

या मार्गदर्शक सूचनांमध्ये सर्व रुग्णालयांमध्ये छोटी छोटी अग्नी प्रतिबंधक यंत्रे भिंतीवर विविध ठिकाणी बसविण्यात यावेत, ही यंत्रे वेळच्या वेळी नियमितपणे पुन्हा भरणे आणि या यंत्रांचा वापर करता यावा, यासाठी ती सहजपणे काढता यावीत, अशा ठिकाणी बसविणे बंधनकारक केले आहे. फायर सेफ्टी आॅडिटमधील सर्व त्रुटींची पुर्तता करावी, जास्त जोखीम असलेल्या भागात जास्तीत जास्त अग्निशामक यंत्रे बसविण्यात यावीत, आग लागल्यास लिफ्टचा वापर करण्यात येऊ नये, अशा सूचना रुग्णालयांच्या दर्शनी भागात ठळकपणे लावण्यात याव्यात, अग्निशमन दलाची संख्या, प्रशिक्षित स्वयंसेवक, आपत्ती व्यवस्थापन कक्ष आदीची माहिती रुग्णालयाच्या समोरच्या भागात लावण्यात यावी आदींसह प्रमुख बारा मार्गदर्शक सूचना सरकारने रुग्णालयांना दिल्या आहेत.

आरोग्य कर्मचाऱ्यांनी घ्यावयाची खबरदारी

  • प्रत्येक वॉर्डाच्या बाहेर जाण्यासाठीच्या दरवाज्यासमोर अडगळ ठेऊ नये.

  • रुग्णालयात स्प्रींकलर, फायर अलार्म, स्मोक डिटेक्टर त्वरित बसवावेत.

  • अतिदक्षता विभागात वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांची सातत्याने उपस्थिती असावी.

  • हालचाल करू शकत नसलेल्या रुग्णांच्या वॉर्डात २४तास कर्मचारी नियुक्त असावेत.

  • रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजची नियमित तपासणी करावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com