esakal | येरवड्यात उभारणार कच्च्या कैद्यांसाठी नवे कारागृह
sakal

बोलून बातमी शोधा

New-Jail

येरवडा मध्यवर्ती कारागृहातील एकूण तीस बराकींमध्ये असलेल्या कैदी क्षमतेपेक्षा दुपटीच्या वर कैदी दाटीवाटीने राहत आहेत. त्यामुळे कारागृहाच्या शेजारील जागेत केवळ कच्च्या कैद्यांसाठी नवीन कारागृह बांधले जाणार आहे.

येरवड्यात उभारणार कच्च्या कैद्यांसाठी नवे कारागृह

sakal_logo
By
दिलीप कुऱ्हाडे

पुणे - येरवडा मध्यवर्ती कारागृहातील एकूण तीस बराकींमध्ये असलेल्या कैदी क्षमतेपेक्षा दुपटीच्या वर कैदी दाटीवाटीने राहत आहेत. त्यामुळे कारागृहाच्या शेजारील जागेत केवळ कच्च्या कैद्यांसाठी नवीन कारागृह बांधले जाणार आहे. यासाठी पावणेदोनशे कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्य सरकारकडे पाठविल्याची माहिती शाखा अभियंता अजय देशमुख यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

असे आहे सध्याचे कारागृह

 • सर्कल एक, तीन आणि टिळक यार्डात प्रत्येकी आठ बराकी आहेत
 • सर्कल दोनमध्ये सहा बराकी आहेत 
 • किशोर विभागात तीन बराकी आहेत 
 • अंडासेलसह फाशी सुनावलेले कैद्यांसाठी वेगळी व्यवस्था
 • पक्के कैदी तीस, तर कच्चे कैदी सत्तर टक्के आहेत

बंटी-बबलीची जोडी, करते घरफोडी; बारामतीत १९ गुन्ह्यांचा भांडाफोड

नव्या इमारतीची रचना

 • प्रास्तावित कारागृहाची इमारत तळ आणि पहिला मजला असणार आहे.
 • समोरच्या बाजुला प्रशासकीय इमारत, वरिष्ठ तुरुंगाधिकारी, तुरुंग अधिकारी यांचे कार्यालय असणार आहे. 
 • मध्यवर्ती भागात सेंट्रल किचन, गिरणी, किचनशेजारी दोन बराकी, धान्य गोदाम, रुग्णालय, प्रयोगशाळा, औषधांची खोली, वैद्यकीय अधिकाऱ्यांची खोली, पन्नास खिडक्यांचा मुलाखत कक्ष, ग्रंथालय, प्रतीक्षालय आदी सुविधा असतील.
 • यामध्ये कच्च्या कैद्यांना ठेवण्यात येईल. 

मुलाच्या लग्नातील पाहुणचार धनंजय महाडिकांना महागात; तिघांवर गुन्हा दाखल

मध्यवर्ती कारागृह

 • ६५ एकर एकूण क्षेत्रफळ
 • २,३२३ कैदी क्षमता 
 • ५,५०० असलेले कैदी

प्रस्तावित कारागृह

 • ३० एकर एकूण क्षेत्रफळ
 • ३००० कैदी क्षमता
 • ३० सराईतांसाठी खोल्या

येरवडा मध्यवर्ती कारागृहामधील कैद्यांची संख्या पाहता येथे नवीन कारागृहाची आवश्‍यकता होती. त्यामुळे तसा प्रस्ताव तयार केला आहे. 
- योगेश देसाई, कारागृह उपमहानिरीक्षक, पश्‍चिम महाराष्ट्र

Edited By - Prashant Patil