पारगाव येथे आजपासून नवीन पोलीस ठाणे सुरू

तालुक्याच्या पूर्व भागातील 22 गावांतील नागरिकांना एक आधार उपलब्ध होणार
New Police station Start At Pargaon
New Police station Start At PargaonSakal

पारगाव - पारगाव, ता. आंबेगाव येथे नव्याने सुरु झालेल्या पोलीस ठाण्यामुळे तालुक्याच्या पूर्व भागातील 22 गावांतील नागरिकांना एक आधार उपलब्ध होणार असल्याची माहिती खेड विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी सुदर्शन पाटील यांनी दिली. आज शुक्रवारी प्रशासनाच्यावतीने येथे नवीन पोलिस ठाण्याचे उदघाटन ज्येष्ठ नागरिक रायचंद गांधी, खंडू महाराज दातखिळे, विठ्ठल महाराज साबळे यांच्या हस्ते व पोलीस उपविभागीय अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती झाले.

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक या ठिकाणी पूर्वी पोलीस चौकी कार्यरत होती, या परिसरात साखर कारखान्यामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा वावर असतो, त्यामुळे अनेक वेळा किरकोळ स्वरूपाचे गुन्हे घडत असतात, गुन्हा घडल्यानंतर नागरिकांना मंचर या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यासाठी जावे लागत होते, ग्रामस्थांच्या मागणीनुसार गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रयत्नातून राज्य शासनाने या ठिकाणी पोलीस स्टेशन ठाण्याला यापूर्वीच मंजुरी दिली होती ते पोलीस ठाणे आजपासून प्रत्यक्षात सुरू झाले आहे.

याप्रसंगी सरपंच बबन ढोबळे, शरद बँकेचे संचालक दौलत लोखंडे, बजरंग देवडे, ग्रामविकास अधिकार के डी.भोजने, अकबर मुजावर, मंचरचे पोलीस निरीक्षक सतीश होडगर, पारगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे, राजेश नलावडे, सोमनाथ वाफगावकर, ठाणे अंमलदार गणेश डावखर, पोलीस कर्मचारी,22 गावातील पोलिस पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी बोलताना सुदर्शन पाटील म्हणाले या पोलिस ठाणे अंतर्गत एक पोलिस निरीक्षक, दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक व 55 कर्मचारी असा स्टाफ उपलब्ध होणार आहे, सध्या 30 कर्मचारी या ठिकाणी कार्यरत असणार आहे. सध्या इमारतीचे बांधकाम चालू न झाल्यामुळे तात्पुरते एका इमारतीत पोलीस ठाण्याचे कामकाज चालणार आहे.

या पोलीस ठाण्याच्या हद्दीत पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक, शिंगवे, देवगाव, लाखनगाव, निरगुडसर, काठापूर बुद्रुक, नागापूर, जवळे, भराडी, लोणी धामणी, पहाडदरा, पोंदेवाडी, जारकरवाडी, शिरदाळे, खडकवाडी, रानमळा, मांदळेवाडी, वडगावपीर, वाळुंजनगर, मेंगडेवाडी अशी एकूण २२ गावे जोडण्यात आली आहे. सूत्रसंचालन निलेश पडवळ यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com