बारामतीत डॉक्टरांचे पोलिस फर्स्ट...

मिलिंद संगई
Friday, 1 May 2020

कोरोनाच्या लढाईत पोलिस बांधव देत असलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बारामतीच्या वैद्यकीय व्यावसायिकांनी आता पोलिस फर्स्ट ही संकल्पना अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. 

बारामती : कोरोनाच्या लढाईत पोलिस बांधव देत असलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बारामतीच्या वैद्यकीय व्यावसायिकांनी आता पोलिस फर्स्ट ही संकल्पना अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाच्या लढाईत सर्वाधिक काळ रस्त्यावर राहणारा घटक म्हणून पोलिसांकडे पाहिले जाते. बारामतीच्या इंडियन मेडीकल असोसिएशनने आता हे संकट दूर होईपर्यंत प्रत्येक दवाखान्यात पोलिस किंवा त्यांचे कुटुंबिय तपासणीसाठी गेल्यास त्यांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. इतकेच नाही तर पोलिसांना तपासणीसाठी बाह्यरुग्ण विभागाचे शुल्कही आकारले जाणार नाही. 

पोलिस कर्तव्यावर असताना त्यांचा वेळ वाचणे गरजेचे आहे, त्यांचा दवाखान्यात अधिकचा वेळ जाऊ नये या उद्देशाने हा निर्णय घेतल्याची माहिती इंडियन मेडीकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. विभावरी सोळुंके, आय.एम.ए.चे राज्याचे माजी उपाध्यक्ष डॉ. अशोक तांबे, डॉ. सुजित अडसूळ, डॉ. संजय पुरंदरे, डॉ. संतोष घालमे यांनी दिली. 

- ...अन् राष्ट्रवादीच्या 'त्या' नगरसेवकासह 45 जणांचा जीव भांड्यात पडला; भरवले होते रक्तदान शिबिर!

कर्तव्यावर असताना तुम्ही वेळेचे भान ठेवत नसला तरी तुमच्या वेळेची किंमत आम्ही ठेवणार आहोत, क्वचित प्रसंगी तुम्हाला जो कुटुंबियांसमवेत वेळ द्यायला मिळतो, तो वेळ आम्ही जपायला हवा, तो जपण्याचा आम्ही निर्धार केला आहे, आपल्या नियमित क्षेत्रापलिकडे पडेल ती जबाबदारी अतिशय संवेदनशीलतेने पार पाडणा-या पोलिसांना आम्ही मानाचा मुजरा करत आहोत, या शब्दात 'आयएमए'च्या वतीने भावना व्यक्त करण्यात आल्या आहेत. बारामतीतील कोणत्याही दवाखान्यात गेल्यास तुम्ही पोलिस किंवा त्यांचे कुटुंबिय असल्याची सूचना देताक्षणी त्वरित सेवा दिली जाईल, असेही सूचित करण्यात आले आहे. 

- पुण्यात कोरोनाच्या विर्सजनाचा 'श्रीगणेशा'; काय घडलं वाचा!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New scheme for police in Baramati