...अन् राष्ट्रवादीच्या 'त्या' नगरसेवकासह 45 जणांचा जीव भांड्यात पडला; भरवले होते रक्तदान शिबिर!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 30 April 2020

कोरोनाच्या साथीत पुणे शहरात रक्‍ताचा तुटवडा असल्याने त्याची पुर्तता करण्याच्या उद्देशाने त्या नगरसेवकाने रक्तदान शिबिर भरवले.

पुणे : कोरोनाच्या दहशतीचा धाक वाढल्यानंतर सलग दीड महिन्यांपासून लोकांच्या घरादारापर्यंत पोचत त्यांना मदतीचा हात देणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या एका नगरसेवकावरच बुधवारी (ता.३०) अचानक कोरोनाची टेस्ट करण्याची पाळी आली. ती त्यांनी भरविलेल्या रक्तदान शिबिरामुळे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या शिबिरात रक्तदान केलेली एक व्यक्ती कोरोना 'पॉझिटिव्ह' असल्याचे उघड झाले आणि नगरसेवकासह रक्तदान केलेल्या 45 जणांचे कुटुंबीय चिंतेत आले. त्यावरचा एकमेव उपाय म्हणून खासगी हॉस्पिटल गाठून या सगळ्याजणांनी कोरोनाची 'टेस्ट' केली आणि साऱ्यांचा रिपोर्ट निगेटिव्हा आला. तेव्हा सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. 

शहरात प्रामुख्याने पूर्व भागांत म्हणजे हडपसरमध्ये कोरोनाने आपले हातपाय परसले आणि पहिल्याच टप्प्यात रुग्णही सापडले. पुढे ती संख्या वाढत गेली आणि आजघडील हडसपरपट्टयात 35 रुग्ण आहेत. त्यापैकी काहीजणांचा कोरोनाने जीवही घेतला आहे.

- पुण्यात कोरोनाच्या विर्सजनाचा 'श्रीगणेशा'; काय घडलं वाचा!

परिणामी, लोकांत भीती पसरताच संबंधित नगरसेवक आणि त्यांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि लोकांना सावध राहण्याचे आवाहन करीत राहिले. त्यापाठोपाठ नागरिकांची रोजची गरज लक्षात घेऊन, त्यांना अन्नधान्यांपासून भाजीपाल्याची मदत केली. तेव्हा, आपल्या प्रभागात आरोग्य सेवांची व्याप्तीही वाढविली. मात्र, कोरोनाच्या साथीत पुणे शहरात रक्‍ताचा तुटवडा असल्याने त्याची पुर्तता करण्याच्या उद्देशाने त्या नगरसेवकाने रक्तदान शिबिर भरवले. पहिल्या दोन टप्प्यांत महिलांसह अनेकांनी रक्तदान केल्याने संबंधित नगरसेवकाने तिसऱ्यांदा रक्तदान शिबिर घेतले. त्यात सहभागी झालेल्या एका पुरुषाला कोरोनाचा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

- Big Breaking : बारामती झाली कोरोनामुक्त; अखेरचा पेशंट घरी परतला!

या टप्यांत 50 जणांनी रक्तदान केले होते. शिबिर आटोपून काही मिनिटे झाली नाहीत, तोच रक्तदान केलेल्या संबंधित रुग्णाची माहिती पसरली. त्यामुळे नगरसेवक आणि त्यांचे कार्यकर्ते प्रचंड घारबले. त्यापाठोपाठ त्यांच्या कुटुंबातील सदस्यही भीती ओझ्याखाली आले. दरम्यान, स्वत:सह सगळ्या कार्यकर्त्यांची तपासणी करीत त्या नगरसेवकाने साऱ्यांना धीर दिला. विशेष म्हणजे, पहिल्या टप्प्यातील 35 आणि त्यानंतर दहा कार्यकर्त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. 

- आपल्यासमोर अर्थिक संकट; ४० टक्के उत्पन्न कमी होणार : शरद पवार

नगरसेवक म्हणाले, ''रक्तदान केलेल्या व्यक्तीला कोरोना झाल्याने आम्हालाही भीती वाटली. मात्र, रिपोर्ट आल्यानंतर भीती संपली आहे. आमच्यौपकी एकालाही कोरोना झाला नाही. त्यामुळे सुरक्षित आहोत.''

- पुण्याच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: in pune 45 people including a ncp corporator have received negative coronavirus reports