बारामतीत सुरु होणार नवीन वाहन क्रमांक मालिका

letter from a resident of Kothrud to the Union Minister to solve problems
letter from a resident of Kothrud to the Union Minister to solve problems
Updated on

बारामती : येथील उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयात  खासगी वाहनासाठी नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. ही मालिका दुचाकी वाहनासाठी सुरु करण्यात येत असून चारचाकी वाहनांनादेखील आकर्षक क्रमांक घेता येईल. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे यांनी ही माहिती दिली. 

मालिकेतील नोंदणी क्रमांक प्रथम प्राधान्याने विहित शुल्क  भरुन चारचाकी वाहनांना देणेत येईल व त्यानंतर दुचाकी वाहनांना देणेत येईल. मालिकेतील वाहन क्रमांकासाठी ज्या चारचाकी व दुचाकी वाहन मालकांना आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित शुल्क (चारचाकींसाठी विहित शुल्काच्या तिप्पट)  भरुन  हवे असतील त्यांनी  24 डिसेंबरला  सकाळी साडेदहा  ते दुपारी अडीच वाजेपर्यंत अर्ज व शुल्क रक्कमेच्या डी.डी. सह जमा करणे गरजेचे आहे. 

Video : पुण्यात पुन्हा शिरला गवा; बावधन परिसरात उडाली खळबळ

अर्ज नमूना व आवश्यक क्रमांकासाठी भरावे लागणारे शुल्काची माहिती कार्यालयीन वेळेत उपलब्ध करुन देण्यात येईल. अर्जासोबत विहित केलेल्या पत्याच्या पुराव्याची साक्षांकित प्रत सादर करणे आवश्यक असेल (लाईट बील, टेलीफोन बील इ.) तसेच अर्जदाराची ओळख पटवण्यासाठी अर्जासोबत अर्जदाराने फोटो ओळखपत्राची (आधार कार्ड/निवडणूक आयोगाचे ओळखपत्र/पासपोर्ट/पॅन कार्ड) साक्षांकित प्रत सादर करावी लागेल.

एकाच नंबरकरीता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी 28 डिसेंबर रोजी सकाळी  अकरा पर्यंत कार्यालयीन नोटीसबोर्डवर लावण्यात येईल व त्या नंबरचे पाकीट लिलाव पध्दतीने वाटप केले जाईल.


महत्त्वाची बातमी : पुणेकरांनो, घाबरून जाऊ नका; संचारबंदीबाबत पोलिस प्रशासनाचे आवाहन

या यादीतील अर्जदारांना लिलावाकरीता जास्त रक्कमेचा डी.डी. जमा करावयाचा असेल त्यांनी 29 डिसेंबर 2020 रोजी दुपारी दोनपर्यंत सीलबंद लखोटयात लिलावासाठी पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठी विनिर्दिष्ट केलेल्या फी च्या डी.डी. व्यतिरिक्त अर्जदाराचे इच्छेप्रमाणे जादा रक्कमेचे डी.डी.

एका लखोटयात स्वत: जमा करावा. त्यासोबत अर्जदारास पॅनकार्डची साक्षाकित प्रत जोडणे अनिवार्य राहील. दिनांक 29 डिसेंबर 2020 रोजी दुपारी 04:30 वाजता उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, बारामती येथे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या उपस्थितीत व्यक्तींसमोर (संबंधित अर्जदार) लखोटा उघडून ज्या अर्जदाराने विनिर्दिष्ट शुल्कापेक्षा जास्तीत जास्त रक्कमेचा डी.डी. सादर केला असेल त्यास नमूद पसंती क्रमांक वितरीत केला जाईल.  लिलावाच्यावेळी चारचाकी वाहनांना प्रथम प्राधान्य दिले जाईल.

हेही वाचा : पुणे शहरात कर्फ्यूचं स्वरुप कसं असणार? महापालिकेनं दिली माहिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com