esakal | पुणे जिल्ह्यात नवीन लाटेत रुग्णसंख्या कमीच राहणार

बोलून बातमी शोधा

 In the new wave of Corona in Pune district the number of patients will be less}

जिल्ह्यात कोरोनाची नवीन लाट असून, त्यामुळे काय परिणाम होतील, याबाबत टीसीएस आणि आयसर यांनी संयुक्त अभ्यास करून विश्‍लेषण केले आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात या अहवालाचे शुक्रवारी सादरीकरण करण्यात आले.

पुणे जिल्ह्यात नवीन लाटेत रुग्णसंख्या कमीच राहणार
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : जिल्ह्यात मागील सप्टेंबरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक होती. सध्या कोरोनाच्या नवीन लाटेत ही रुग्णसंख्या त्या तुलनेत निम्म्यापेक्षा जास्त नसेल, असा निष्कर्ष भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (आयसर) आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) या संस्थांनी पाहणी अहवालात काढला आहे; परंतु हे प्रमाण आणखी कमी करण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील, याबाबतचा अहवाल येत्या आठ दिवसांत प्राप्त होणार आहे. त्यानुसार निर्बंध लावण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

जिल्ह्यात कोरोनाची नवीन लाट असून, त्यामुळे काय परिणाम होतील, याबाबत टीसीएस आणि आयसर यांनी संयुक्त अभ्यास करून विश्‍लेषण केले आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात या अहवालाचे शुक्रवारी सादरीकरण करण्यात आले. त्यानुसार पुणे जिल्ह्यात १० सप्टेंबर २०२० रोजी कोरोनाबाधितांचा सर्वाधिक आकडा चार हजार ९३५ होता. सध्याच्या नवीन लाटेत हा आकडा निम्म्याच्या वर जाणार नाही. मात्र, यापूर्वी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांकडून स्वयंशिस्तीचे पालन केले जात होते. नवीन लाटेत ते गांभीर्य दिसून येत नाही. अशी परिस्थिती निर्माण झाल्यास रुग्णालये, महसूल प्रशासन आणि पोलिस यंत्रणेवरील ताण वाढणार आहे. त्यासाठी लोकसहभाग वाढविण्याची गरज असून, त्याशिवाय चित्र बदलणार नाही, असे अहवालात म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
 

शास्त्रोक्त अभ्यास करणार
सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत रुग्णसंख्येचे प्रमाण कमी कसे करता येईल, यासाठी आणखी आठ दिवस अभ्यास करावा, असे दोन्ही संस्थांना सांगण्यात आले आहे. त्यामध्ये शाळा-महाविद्यालये सुरू ठेवावीत की नाही, लग्न समारंभावर नियंत्रण तसेच हॉटेल, बिअर बारमध्ये बसण्याऐवजी पिकअपची व्यवस्था यावर नियंत्रण आणल्यास रुग्णांचे प्रमाण कमी होईल का, याबाबत विश्‍लेषण करण्यात येणार आहे. हा अहवाल पालकमंत्री अजित पवार यांना देण्यात येईल. शास्त्रोक्त अभ्यासानंतरच निर्बंधांबाबत निर्णय घेण्यात येतील, असे राव यांनी स्पष्ट केले.

शाळा-महाविद्यालयांबाबत आज निर्णय
शाळा-महाविद्यालये २८ फेब्रुवारीपर्यंत बंद असून, ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे परिस्थिती पाहून शनिवारी (ता. २७) निर्णय घेण्यात येईल. सद्यःस्थिती पाहता शाळा-महाविद्यालये पुढील आठ दिवस बंदच राहण्याची शक्यता राव यांनी व्यक्त केली.

CTET 2021: केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर; पाहा निकाल